देवगड (प्रतिनिधी) : माझी लाडकी बहीण योजना राबवून महिलांना आर्थिक दृष्ट्या बळकट केल्याबद्दल त्यांचे धन्यवाद मानन्यासाठी देवगड येथील तेजस्वी महिला ढोल ताशा पथकातर्फे एक राखी लाडक्या भावासाठी हा उपक्रम राबण्यात येणार आहे.

या उपक्रमामध्ये देवगड तालुक्यातून जास्तीत जास्त राख्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवारांना पाठविण्याचा आमच्या मानस आहे. तर जास्तीत जास्त महिलांनी या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन हा उपक्रम यशस्वी करावा असे आवाहन तेजस्वी महिला ढोल ताशा पथकाच्या वतीने करण्यात आले आहे.