मुंबई – सध्या सर्वत्र विधानसभेचं रणांगण सुरु झालेय. सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. विधासभेला महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत पाहायला मिळणार आहे. विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक सुरु आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये धुसमुस सुरु असतानाच महायुती आणि महाविकास आघाडी दोन बड्या नेत्यांनी भेट घेतली आहे. हे दुसरे तिसरे कुणीही नसून शिवसेना अध्यक्ष माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. असा दावा चित बहुजन आघाडीचे नेते सिद्धार्थ मोकळे यांनी केला आहे,. यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.

काय म्हणातात सिद्धार्थ मोकळे

वंचित बहुजन आघाडीचे नेते सिद्धार्थ मोकळे यांनी ट्विटर ( एक्सवर ) ट्विटवर व्हिदडीओ शेअर करत म्हणाले की, आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार शिवसेना उबाठाचे खासदार संजय राऊत 25 जुलै रोजी नवी दिल्लीत जे.पी.नड्डा यांना भेटले. 25 जुलै रोजी रात्री दोन वाजता 7 डी मोतीलाल मार्गावर ही भेट झाली. त्यानंतर 5 ऑगस्ट रोजी भाजप नेते देवेंद्र फडणवीस हे स्वतः गाडी चालवत एकटेच उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री बंगल्यावर पोहचले. रात्री 12 वाजता मातोश्रीवर गेल्यावर त्या दोन्ही नेत्यांमध्ये दोन तास चर्चा झाली. त्यानंतर 6 ऑगस्ट रोजी उद्धव ठाकरे दिल्ली जाऊन पोहचले. दिल्लीला जाताना त्यांच्या सोबत कोण कोण होते, दिल्लीत त्यांनी कोणाकोणाच्या भेटी घेतल्या? त्या भेटीत काय काय ठरले, हे जनतेला सांगावे, असे सिद्धार्थ मोकळे यांनी म्हटले आहे.

का केला हा गौप्यस्फोट

भाजप आणि शिवसेना उबाठा यांच्यातील या गाठीभेटींचा गौप्यस्फोट का केला, त्याचे कारण सांगताना सिद्धार्थ मोकळे म्हणाले, राज्यातील आरक्षणवादी मतदारांना भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष हे आरक्षणविरोधी असल्याचे माहिती आहे. परंतु या आरक्षण समर्थक लोकांनी उद्धव ठाकरे यांना मतदान केले आहे. राज्यातील राजकारणात गेल्या पाच वर्षात अनेक घडामोडी घडल्या आहे. यामुळे राज्यातील आरक्षणवादी मतदारांची फसवणूक होऊ नये, यासाठी ही माहिती समोर आणल्याचा दावा त्यांनी केला आहे. आता या दाव्यावर शिवसेना व भाजप नेते काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे.