मुंबई – सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीचं रणांगण सुरु आहे. राजकीय नेते जोरदार प्रचार करत आहेत. अशातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी महायुतीच्या बड्या नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. संजय राऊत हे नेहमी त्यांच्या पडखळ वक्त्यव्यासाठी ओळखले जातात. नेहमी ते विरोधकांवर आपली भूमिका मांडत असतात. अशातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवारांवर निशाणा साधला आहे. आज पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.

काय म्हणाले संजय राऊत..?

संजय राऊत म्हणाले, सत्तेत सामिल होण्यापूर्वी अजित पवार यांनी अनेकदा अमित शहा यांची गुप्त भेट घेतली. जवळपास 10 वेळी भेटी झाल्या. मास्क आणि टोपी घालून अजित पवार दिल्लीत जायचे आणि विमानाचं तिकिट बूक करताना देखील ए.ए.पवार या नावाने विमानाचं तिकिट बूक करायचे… अशी धक्कादायक माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या गौप्यस्फोटावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अजित पवार, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. वेशांतर करूनच या दोघांनी सरकारे पाडली. एकनाथ शिंदे तर भाजपची सत्ता नसतानाही वेशांतर करून काँग्रेस नेत्यांना भेटायचे, असा आरोपच संजय राऊत यांनी केला आहे.

संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना हा घणाघाती हल्ला केला आहे. महाराष्ट्रात रंगमंच, नाटकाची फार मोठी परंपरा आहे. महाराष्ट्राच्या रंगमंचानं अनेक मोठ-मोठे कलाकार दिले आहेत. अगदी बाल गंधर्व यांच्यापासून श्रीराम लागू यांच्यापर्यंत… नाना पाटेकर, प्रशांत दामले यांचं काम देखील आपण पाहतो. अनेक मोठे कलाकार महाराष्ट्राने दिले आहेत. त्या नाट्यसृष्टीने अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दुर्लक्ष केलेलं दिसत आहे. यांना देखील रंगमंचावर नाटकात सहभागी करून घेतलं पाहिजे.कारण इतक्या उत्तम पद्धतीत ते मेकअप करतात… इतक्या उत्तम पद्धतीने आपले चेहरे बदलतात… इतक्या उत्तम पद्धतीने फिरत्या रंगमंचावर काम करतात, असा टोला संजय राऊत यांनी लगावला. आता यावर महायुतीचे बडे नेते काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिले आहेत.