मुंबई – विधानसभा निवडणुकीच बिगुल वाजलं असून राज्यातील राजकारणाचा वेग वाढला आहे. अशातच देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाबाबत मोठं भाष्य केलं आहे. ‘मुख्यमंत्री बनण्याची लालसा माझ्या मनात उरलेली नाही’, असं भाष्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानाने चर्चेला उधाण आणले आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘मी पाच वर्षे राज्याचा मुख्यमंत्री होतो. आतापर्यंत महाराष्ट्रात फक्त दोन मुख्यमंत्र्यांनाच 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करता आला. त्यापैकी एक म्हणजे वसंतराव नाईक आणि दुसरा म्हणजे मी. त्यामुळे आता मुख्यमंत्री बनण्याचं स्वप्न किंवा लालसा माझ्या मनात उरलेली नाही. आता मला जी जबाबदारी देण्यात येईल, त्यामध्ये मी काम करेन. महायुती ज्याला मुख्यमंत्री ठरवेल, त्याच्या पाठिशी मी ठामपणे उभा राहीन.’

यावेळी आर्थिक क्षेत्रात काम करणे ही माझी आवड होती. वकिली करणे हे माझे स्वप्न होते, पण ते स्वप्न भंगले. त्यामुळे मी गेल्या 25 वर्षांपासून विधानसभेत जनतेची वकिली करत आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.