मुंबई ( प्रतिनिधी ) : देसी गर्ल प्रियांका चोप्रा लवकरच घर वापसी करणार आहे. प्रियांकाच्या चाहत्यांना पुन्हा तिला बॉलिवूड चित्रपटात काम करताना पाहयला मिळणार आहे. आजकाल ती हॉलिवूड चित्रपट आणि मालिकांमध्ये जास्त काम करत आहे. बॉलिवूड असो वा हॉलिवूड प्रियांकाने तिच्या दमदार अभिनयाने सर्व चाहत्यांची वारंवार मने जिंकली आहेत.

प्रियांका चोप्रा राजकुमार रावसोबत 2021 मध्ये रिलीज झालेल्या ‘व्हाइट टायगर’ या चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट इंग्रजी भाषेत बनवला होता. यानंतर अभिनेत्रीने अमेरिकन चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली.

2025 मध्ये प्रियांका करणार बॉलिवूडमध्ये काम?

प्रियांका चोप्रा नुकतीच रेड सी फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाली होती. यादरम्यान, तिने बॉलीवूड चित्रपट आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील त्याच्या पुनरागमनाबद्दल एक मोठे अपडेट दिले आहेत. तिच्या आगामी भारतीय चित्रपटाविषयी बोलताना प्रियांका म्हणाली, ‘भारतीय चित्रपट नेहमीच माझ्या हृदयाचा भाग असतील. ते माझ्यापासून कोणीही काढू शकत नाही. मी 2025 मध्ये एक हिंदी चित्रपट साइन करणार आहे. आपण सर्वांनी आपल्या शुभेच्छा पाठवा जेणेकरून हे खरे होईल.’ असे तिने या मुलाखतीत सांगितले. हे ऐकून चाहत्यांना खूप आनंद झाला आहे.