निपाणी (प्रतिनिधी) : निपाणी तालुक्याील नांगनूर येथे वारकरी संप्रदाय आणि ग्रामस्थांतर्फे माघवारी दिंडी सोहळ्याचे आयोजन केले होते. या दिंडीचे आज (बुधवार) सकाळी गावातील प्रमुख मार्गावरून दिंडीची नगरप्रदक्षिणा झाल्यावर पंढरपूरकडे प्रस्थान झाले. बोरगाववाडी येथे दादा टाकणारे यांच्या घरी दिंडीचे पूजन आणि महाप्रसाद झाल्यावर तेथून दिंडी पंढरपूरकडे रवाना झाली.

या सोहळ्यात पहाटे काकड आरती, सकाळी प्रवचन, दुपारी हरिपाठ, रात्री कीर्तन सेवा होणार आहे. जर्नादन सुतार-गडहिंग्लज, सुभाष लोहार-कोरोची, बाळासाहेब माने-इचलकरंजी यांचे कीर्तनही होणार आहे. तर 8 फेब्रुवारीला नगरप्रदक्षिणा होणार आहे. 9 फेब्रुवारीच्या सकाळी वारकरी महामंडळचे अध्यक्ष, वेदांताचार्य लोकेश चैतन्य महाराज यांचे काल्याचे किर्तन होणार आहे.