बोरपाडळे (प्रतिनिधी) : रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर यांच्या वतीने सन २०२० चा आदर्श शिक्षिका पुरस्कार करवीर तालुक्यातील नेर्ली येथील प्राथमिक शाळेच्या अध्यापिका दिपाली कतगर यांना देण्यात आला.

दिपाली कतगर यांनी आपल्या १४ वर्षाच्या सेवाकालामध्ये विद्यादान, अध्यापन, विद्यार्थ्यांसाठी डिजीटल साधनांचा वापर, तालुका, जिल्हा, राज्य पातळीवर उत्कृष्ट दिलेले प्रशिक्षण, जि.प. शाळेमध्ये शिष्यवृत्ती, नवोदय, केटीएस, जिल्हास्तरीय शैक्षणिक साहित्यनिर्मिती, कला, क्रिडा, सांस्कृतिक आदी उपक्रमाबरोबरच ऑनलाईन शिक्षण प्रणाली, लेक वाचवा लेक शिकवा, अशा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले. त्यांच्या शैक्षणिक कार्याची दखल घेऊन रोटरी क्लबचे प्रेसीडंट अनिकेत अष्टेकर, अंकेत शहा, महेश जाधव, संग्राम पाटील यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.