मुंबई – सध्या राज्यात विधानसभेचं रणांगण सुरु झालंय. 20 नोव्हेंबरला मतदान होणार असून, 23 नोव्हेंबरला लगेचं निकाल लागणार आहे . त्यामुळे सध्या राज्यात विधानसभेची रेलचेल पाहायला मिळत आहे. एकीकडे विधानसभेचं राज्यात वारं वाहत आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीचा बोलबाला सुरु आहे. राज्य सरकारने जुलै ते नोव्हेंबर पर्यंतचे पैसे महिलांच्या खात्यात जमा केलं आहे. त्यामुळे ही योजना पुढे सुरु राहणार आहे कि नाही हा प्रश्न पडत असतांनाच काँग्रेसचे राज्य प्रभारी रमेश चेन्निथला यांनी मोठा दावा केला आहे. महायुती सरकारची लाडकी बहीण योजना बंद केली आहे. आता निवडणूक आयोगाचे कारण देऊन ही योजना बंद केली आहे. असा दावा त्यांनी केलाय.

काय म्हणाले रमेश चेन्निथला..?

महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली होती. ही योजना लोकप्रिय ठरली आहे. आता या योजनेसंदर्भात काँग्रेसचे राज्य प्रभारी रमेश चेन्निथला यांनी मोठा दावा बुधवारी केला. त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, महायुती सरकारची लाडकी बहीण योजना बंद केली आहे. आता निवडणूक आयोगाचे कारण देऊन ही योजना बंद केली आहे. त्यांच्याकडे पैसे नाही. आता लाडक्या बहिणांना एक पैसा मिळणार नाही. ही योजना फक्त निवडणुकीसाठी होती, असा दावा चेन्निथला यांनी केला. तसेच महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी मंत्रिमंडळ बैठकीत अनेक निर्णय घेतले. परंतु त्यातील एकही निर्णय यशस्वी होणार नाही, असे त्यांनी म्हटले.

पुढे ते म्हणाले महायुतीत जोरदार भांडणे सुरु आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या कोट्यातून भाजप नेते निवडणूक लढवत आहे. राज्यात ही विचित्र युती झाली आहे. या पद्धतीची युती आम्ही कधी पाहिली नाही. शिवसेना आणि राष्ट्रवादीतून निवडणूक भाजपच लढवत आहे. महायुती संपली आहे. आता यावर महायुतीचे बडे नेते काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे.