मुंबई : 30 वर्ष प्रेक्षकांच्या मनात घर करून असलेला यशराज फिल्म्स निर्मित ब्लॉकबस्टर सिनेमा ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ या चित्रपटाची क्रेझ अजूनही दर्शकांच्या मध्ये पाहायला मिळते. आदित्य चोप्रा यांनी दिग्दर्शक केलेला हा रोमँटिक, कॉमेडी सिनेमा आहे. ऑलटाईम ब्लॉकबस्टर ठरलेल्या या सिनेमाच्या कामगिरी मध्ये आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

स्टॅच्यू ‘सीन्स इन द स्क्वेअर’
‘डीडीएलजे’ आता लंडनमधील लेस्टर स्क्वेअरमध्ये स्टॅच्यू बसवणारा पहिला भारतीय चित्रपट बनणार आहे. चित्रपटातील एका दृश्यातील शाहरुख आणि काजोलचा स्टॅच्यू ‘सीन्स इन द स्क्वेअर’ मध्ये बसवण्यात येणार आहे. हार्ट ऑफ लंडन बिझनेस अलायन्सनं या संदर्भात घोषणा केली. लेस्टर स्क्वेअरमधील ‘सीन्स इन द स्क्वेअर’ चित्रपटाच्या ट्रेलमध्ये आता डीडीएलजेच्या रूपात एक नवा पुतळा असणार आहे . ही लंडनच्या लीसेस्टर स्क्वेअरमध्ये उभारली जाणारी पहिली भारतीय चित्रपट मूर्ती ठरेल. ही कांस्य मूर्ती बॉलिवूडचे दोन सुपरस्टार, शाहरुख खान आणि काजोल यांच्या डीडीएलजे मधील प्रसिद्ध पोजमध्ये असणार आहे. हा पुतळा Odeon सिनेमा बाहेरील पूर्व टेरेसवर बसवला जाणार असून, लंडनमधील इतर ठिकाणं – Horseguards Avenue, Hyde Park, Tower Bridge, आणि King’s Cross Station देखील दाखवण्यात आली आहेत.

आंतरराष्ट्रीय सिनेमा क्षेत्रात डीडीएलजे समावेश

या चित्रपटावर आधारित Come Fall In Love – The DDLJ Musical हे नवीन संगीत नाटक 29 मे 2025 पासून मॅंचेस्टर ओपेरा हाऊसमध्ये सुरू होणार आहे. मागील 100 वर्षांतील 10 अन्य आयकॉनिक पात्रांमध्ये हैरी पॉटर, लॉरेल और हार्डी, बग्स बनी, जीन केली (सिंगिंग इन रेन), मैरी पॉपिंस, मिस्टर बीन, पैडिंग्टन आणि DC सुपरहीरोज बैटमैन आणि वंडर वीमेन यांचा समावेश आहे. सुपरस्टार शाहरुख खान आणि काजोल यांचा हा सिनेमा आता ‘सीन्स इन द स्क्वायर’मध्ये या आंतरराष्ट्रीय सिनेमा क्षेत्रातील दिग्गजांसोबत समाविष्ट होणार आहे.