मुंबई (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून सातारा लोकसभेची जागा शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली लढवली जात होती. मात्र राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर यंदाच्या लोकसभेला साताऱ्याची जागा जागावाटपात भाजपकडे गेली असता , राज्यसभेची जागा अजित पवार भाडपकडून मागून घेतली . 3 सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील 2 जागा , 9 राज्यांतील राज्यसभेच्या रिक्त असणाऱ्या 12 जागांसाठी पोटनिवडणूक घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने जाहीर केल्या आहेत.

काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक संपन्न


साताऱ्याची जागा निवडून आणा, नितीन पाटलांना खासदार करतो, असे जाहीर वचन अजित पवार यांनी साताऱ्यात जाऊन दिले होते. साताऱ्याची जागा महायुतीने जिंकल्यानंतर अजित पवार यांनी दिलेला शब्द पाळत नितीन पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे राज्यसभेवर पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे .राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक सोमवारी रात्री संपन्न झाली. या बैठकीत एकमताने नितीन पाटील यांचे नाव जाहीर करण्यात आले . त्याचबरोबर, बुधवारी दुपारी 12 वाजता नितीन पाटील राज्यसभेसाठीचा उमेदवारी अर्ज दाखल करतील.