इचलकरंजी (प्रतिनिधी) : लॉकडाऊन काळातील संपूर्ण वीजबिल माफ करावे, या मागणीसाठी माकपच्या वतीने इचलकरंजी येथील गांधी पुतळा चौकात जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी जोरदार घोषणाबाजी करुन परिसर दणाणून सोडला.

या आंदोलनाला आ. प्रकाश आवाडे यांनी पाठिंबा देऊन वीजबिल मागणी संदर्भात मी कायम तुमच्यासोबत आहे. हा लढा आणखी तीव्र करुन जनतेला न्याय मिळाल्याशिवाय स्वस्थ बसायचे नाही, असे आवाहन केले. यावेळी शिष्टमंडळाने  मागण्यांचे निवेदन आ. आवाडे यांना दिले.

यावेळी माकपचे ज्येष्ठ कामगार नेते दत्ता माने, प्राचार्य ए.बी.पाटील, भरमा कांबळे, शिवगोंडा खोत, भाऊसाहेब कसबे, धनाजी जाधव, सुभाष कांबळे, सदा मलाबादे, संजय टेके, पार्वती जाधव, माया सुतार, सुवर्णा देवसानी आदीसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.