कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : 11 फेब्रुवारीपासून बारावीची परीक्षा सुरू होत आहेत. कोल्हापुरात बारावीच्या परीक्षा प्रवेश पत्रिकेवरून गोंधळ पाहायला मिळत आहे. प्रवेश पत्रिकेवर वेगळेच विषय आले आहेत. शिवाजी पेठेतील विमला गोयंका शाळा परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
शनिवारी परीक्षेचे हॉल तिकीट वाटप करण्यात आले. त्यात विद्यार्थ्यांचे विषय बदलून आल्याचे विद्यार्थ्यांच्या निर्दशनास आले. तर काही विद्यार्थ्यांना हॉल तिकीटच मिळाले नाही. ज्या विद्यार्थ्यांना हॉल तिकीट मिळाले त्यावर कॉम्युटर सायन्सच्या ठिकाणी मराठी, भुगोल, जीवशास्त्र या विषयांच्या जागी गणित आणि मराठी असे विषय आले आहेत. सोमवारपासून परीक्षा सुरू होणार असल्याने तत्काळ परीक्षेचे हॉल तिकीट बदलून देण्याची मागणी पालकांनी केली आहे.