कोल्हापूर (प्रतिनिधी ) : थंडीच्या दिवसांमध्ये आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. सतत कंबर दुखणे, हात पाय दुखणे, पाठ दुखणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. कंबर दुखीचा त्रास सुरु झाल्यानंतर अनेक लोक मेडिकल मध्ये उपलब्ध असलेल्या गोळ्यांचे सेवन करतात. मात्र या गोळ्यांचे सतत सेवन करणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. पण अळीवाच्या बीयांच्या सेवनाने कंबर दुखीपासून आराम मिळतो.
अळीव हे औषधी गुणधर्म असलेले आरोग्यासाठी अतिशय प्रभावी आहे. अळीवमध्ये कॅल्शियम, लोह, प्रथिनं, फायबर, आणि अँटी-ऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळून येतात. लाल रंगाच्या नाजूक साजूक बिया आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहेत. त्यामुळे हिवाळ्याच्या दिवसांमध्ये नियमित या बियांचे सेवन करावे. बाजारात अळीव सहज उपलब्ध होतात. थंडीच्या दिवसांमध्ये अळीव खाल्यामुळे शरीराला ऊर्जा आणि उष्णता मिळते. सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी अळीव बियांचे नियमित सेवांह केल्यास कंबर दुखीच्या वेदनांपासून कायमचा आराम मिळेल.
अळीवाचे सेवन कसे करावे?
अळीव पासून खीर बनवली जाते. शिवाय लाडू किंवा मुखवास बनवताना अळीव बियांचा वापर केला जातो. रिकाम्या पोटी अळीव बियांचे सेवन केल्यास सकारात्मक परिणाम दिसते. तसेच तुम्ही या बिया तूप आणि दुधात मिक्स करून देखील खातात. यामुळे शरीराला पोषण मिळेल. हिवाळ्याच्या दिवसांमध्ये अळीव, हळद आणि दूध एकत्र मिक्स करून खाल्यास शरीराला ऊर्जा मिळेल. तसेच थंडीमुळे शरीराला आलेली सूज कमी होण्यास मदत होईल.
हाडांमधील ताकद आणि उर्जा टिकवून ठेवण्यासाठी नियमित अळीव बियांचे सेवन करावे. या बिया हाडांचे आरोग्य मजबूत करण्यास मदत करतात. अळीव बियांमध्ये असलेले गुणधर्म सांधेदुखी आणि कंबर दुखीपासून वेदनांपासून आराम मिळवून देण्यासाठी मदत करतात. अळीव बियांचे सेवन केल्यामुळे शरीराचे रक्तभिसरण सुधारते. त्यामुळे रोजच्या रोज पाण्यासोबत किंवा दुधासोबत अळीव बियांचे सेवन करावे. यामुळे कंबर दुखीचा त्रास कमी होईल.