नांदेड : नांदेड जिल्हातील काँग्रेस आमदार जितेश अंतापूरकर भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सध्या सुरु झाली आहे. अंतापूरकर यांनी गुरु पौर्णिमेच्या दिवशी माजी मुख्यमंत्री तसेच भाजप खासदार अशोक चव्हाण यांची मुंबई येथे भेट देखील घेतली. या भेटीनंतर काँग्रेसला धक्का बसल्याच बोललं जातंय.अंतापुरकर हे भाजप राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय मानले जातात.
कोण आहेत जितेश अंतापूरकर ?
जितेश अंतापूरकर हे देगलूर विधानसभा मतदार संघांचे आमदार आहेत. त्यांचे वडील रावसाहेब अंतापूरकर सुद्धा राजकरणात सक्रिय होते. मात्र त्यांचे आकस्मिक निधन झाले. वडिलांच्या निधना नंतर ऑक्टोबर 2021 च्या पोटनिवडणुकीत जितेश अंतापूरकर यांनी काँग्रेस कडून निवडणूक लढवली, या निवडणुकीत त्यांचा विजय देखील झाला. अंतापूरकर हे अशोक चव्हाण यांचे खंदे समर्थक मानले जातात. अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर अंतापूरकर हे पक्षापासून अलिप्त राहिले. काँग्रेसच्या एकाही कार्यक्रमात त्यांनी हजेरी लावली नाही. लोकसभा निवडणुकीतही अंतापूरकर यांनी काँग्रेस उमेदवाराचा प्रचार केला नाही. जितेश अंतापूरकर हे चव्हाण यांचे खंदे समर्थक असल्याने ते देखील काँग्रेस सोडणार हे निश्चित मानले जात होते