कोल्हापूर ( प्रतिनिधी ) – कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हॉटेल सयाजी येथे झालेल्या संविधान सन्मान परिषदेत आवर्जून विठ्ठल रुक्माई ची प्रतिमा भेट देणाऱ्या कदमवाडी येथील स्वप्निल कुंभार याचा आपल्या भाषणामध्ये तीन वेळा आवर्जून उल्लेख केला.

समाजातील उपेक्षित आणि हातामध्ये कला असणाऱ्या प्रत्येक युवा वर्गाला योग्य संधी आपल्या सध्याच्या यंत्रणेत मिळत नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली. वास्तविक हे कलाकार लोक व्यासपीठावर असली पाहिजेत मात्र ते नेहमीच व्यासपीठाच्या मागे आणि व्यासपीठाच्या फार लांब असतात असे त्यांनी नमूद केले.

व्यासपीठावरून राहुल गांधींनी आपल्या भाषणात स्वप्नील कुंभार यांना पुन्हा व्यासपीठावर बोलावले. मात्र बंधूंच्या वैद्यकीय मदतीसाठी कुंभार बाहेर गेले असल्याने ते त्यावेळी येऊ शकले नाहीत मात्र भाषण संपल्यानंतर काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी स्वप्निल कुंभार यांचे राहुल गांधी यांच्याशी खासदार भेट घालून दिली. यावेळी बंधूंच्या उपचाराची ही माहिती घेत कोणतीही मदत करण्यास आपण आपली कार्यकर्ते तयार असल्याचेही राहुल गांधींनी सांगितले.

या भेटीने आपण भारावून गेलो असून आपणास एक मोठी प्रेरणा मिळाल्याचेही स्वप्निल कुंभार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.