मुंबई : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठं यश मिळाल्यानंतर आता आगामी विधानसभा डोळ्यासमोर ठेऊन मविआतील घटक पक्ष जोमाने कामाला लागले आहेत. तर आगामी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने एक समन्वय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आणि विधान परिषदेचे गटनेते सतेज पाटील यांचा या समितीमध्ये समावेश करण्यात आला आहे. विधानसभेसाठी मविआसोबत जागा वाटपावर चर्चा करण्यासाठी काँग्रेस कमिटी जाहीर केलीय.
महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने एक समन्वय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय. ही समन्वय समिती निवडणुकीपूर्वी महत्त्वाचे निर्णय घेईल आणि तिन्ही पक्षांमध्ये समन्वय रखण्याचा प्रयत्न करणार आहे. या समितीत काँग्रेसच्या वतीने प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांच्यासह कोल्हापूर काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विजय वडेट्टीवार, पृथ्वीराज चव्हाण, नसीम खान, नितीन राऊत यांचा समावेश करण्यात आला आहे.
तर मुंबईमधील जागावाटपासंदर्भात पक्षाकडून वर्षा गायकवाड, भाई जगताप, अस्लम शेख या तिघांवर जबाबदारी दिली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या मान्यतेनं ही समिती स्थापन करण्यात आली आहे. कोल्हापुरात लोकसभा निवडणुकीला शाहू महाराज यांना निवडून आणण्यामध्ये आमदार सतेज पाटील यांचा मोलाचा वाटा होता.