कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : विश्व हिंदू परिषद – बजरंग दल तर्फे संपुर्ण भारतात दरवर्षी गीता जयंती निमित्त शौर्य सप्ताह कार्यक्रम साजरे होत असतात. त्यानिमित्ताने आज कोल्हापूर शहरात बजरंग दलाचे मोठ्या उत्साहात संचलन श्री रामाच्या जयघोषात उत्साहात झाले. यामध्ये विविध हिंदूत्ववादी संघटनांचे पदाधिकारी यांचाही शुभेच्छापर सहभाग होता.
आज सकाळी मिरजकर तिकटी येथून शिस्तबद्दपणे या संचलनास प्रारंभ झाला. बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोडमार्गे श्री राम, श्री हनुमंत, भारत मातेच्या घोषणा देत, बजरंग दल म्हणजे सकल हिंदू समाजाला एक सुरक्षा कवच असल्याची ग्वाही देत हे संचलन महाद्वार रोड मार्गे छत्रपती शिवाजी महाराजानां मानवंदना देऊन दसरा चौक येथे आले. राजर्षी शाहू महाराज यांचे चरणी पुष्पहार अर्पण करून अतिशय शिस्तबद्ध आणि शांततेत संचलन करून समारोप करण्यात आला. शहरातील बजरंगीसह जिल्ह्यातील राधानगरी, गगनबावडा, पन्हाळा, करवीर, भुदरगड तालुक्यातूनही बजरंगी कार्यकर्त्यांनी यात सहभाग घेतला होता.
या संचलनाच्या प्रारंभी स्वप्नील कोडग तसेच शहरातील, भाजपाचे पदाधिकारी सह, सकल हिंदू संघटना प्रमुखांची उपस्थिती होती. हिंदू एकताचे गजानन तोडकर, दिपक देसाई तसेच अनिरुद्ध कोल्हापुरे, शिवसेनेचे बाबा भोसले, सनातनचे किरण दुसे, अभिजित पाटील, शिवप्रतिष्ठानचे आशिष लोखंडे, हिंदू महासभेचे मनोहर सोरप तसेच प्रसन्न शिंदे, निरंजन शिंदे आदींने उपस्थित राहून आपल्या शुभेच्छा दिल्या.
विश्व हिंदू परिषद कोल्हापूर जिल्हामंत्री, अनिल दिंडे, जिल्हा अध्यक्ष कुंदन पाटील, विभाग संयोजक सुरेश रोकडे, जिल्हा सहमंत्री विजय पाटील, शहर मंत्री उत्तम सांडुगडे, बजरंग दल प्रखंड संयोजक निलेश शिंदे, अक्षय ओतारी, प्रदीप सूर्यवंशी आदीने या उपक्रमाचे संयोजन केले.