कोल्हापूर (प्रतिनिधी) : बोरीवडे, (ता. पन्हाळा ) येथील पोलीस पाटील भरत शंकर सुर्यवंशी यांनी लाच मागितल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे. या प्रकरणी पन्हाळा पंचक्रोशीत चर्चेला उधाण आले आहे.

यासंदर्भात प्रशासकीय यंत्रणेतून मिळालेली माहिती अशी, बोरीवडे गावचे पोलीस पाटील सुर्यवंशी व कोडोली पोलीस स्टेशन येथील पोलीस अंमलदार यांनी, तकारदार यांना ते चोरून देशी दारू विक्री करतात या कारणासाठी तुझ्यावर दारू विकी करतोस म्हणुन अर्ज आला आहे असे म्हणून कारवाई करणार तसेच तक्रारदार यांना तुला जर दारू विक्री करायची असेल तर 5,000/- रूपये दयावे लागतील अन्यथा कायदेशिर कारवाई करण्यात येईल असे म्हणुन तकारदार यांच्याकडे 5,000/- रूपयांची मागणी केली होती. म्हणून तक्रारदार यांनी अॅन्टी करप्शन ब्युरो, कोल्हापूर येथे तक्रार दिली होती.

तक्रारदार यांनी अॅन्टी करप्शन ब्यूरो, कोल्हापूर येथे दिलेल्या तक्रार अर्जामध्ये पडताळणी केली असता त्यामध्ये पोलीस पाटील सुर्यवंशी यांनी तक्रारदार यांचेवर कोडोली पोलीस ठाणे येथे दारूचे अनुषंगाने तकार दाखल असुन सदरची तकार कोडोली पोलीस ठाणे येथील पोलीस यांचेकडुन मिटवतो तसेच तक्रारदार यांना दारूचा धंदा सुरू करणेस यापुढेही परवानगी देतो यासाठी कोडोली पोलीस ठाणे येथील पोलीस यांना 5,000/- रूपये दयावे लागतील असे सांगून तक्रारदार यांच्याकडे पोलीस पाटील सुर्यवंशी यांनी 5,000/- रूपयांची मागणी करून तडजोडीअंती 3,000/- रूपयांची लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याने त्याबाबत तक्रारदार यांनी दिले तक्रारीवरून कोडोली पोलीस ठाणे, जि. कोल्हापूर येथे गुन्हा दाखल करणेची प्रक्रिया सुरू आहे.

ही कारवाई शिरीष सरदेशपांडे, पोलीस उपआयुक्त/पोलीस अधीक्षक, अॅन्टी करप्जन ब्यूरो, पुणे. विजय चौधरी, अपर पोलीस अधीक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, पुणे यांचे तसेच वैष्णवी पाटील, पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि. कोल्हापूर मार्गदर्शनानुसार आसमा मुल्ला, पोलीस निरीक्षक, पो.हे. कॉ अजय चव्हाण, पो.ना. सुधिर पाटील, पो.कॉ. कृष्णा पाटील अॅन्टी करप्शन ब्युरो, कोल्हापूर यांनी केली आहे.