कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष करवीरचे आमदार पी. एन. पाटील आज (23 मे) पहाटे निधन झालं. दरम्यान, सडोली खालसा या मुळ गावी पाटील यांच्यावर हजारोंच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. राहुल पाटील यांनी पाटील यांच्या पार्थिवाला अग्नी दिला.
दरम्यान, आमदार पी. एन. पाटील हे रविवारी राहत्या घरी बाथरुममध्ये पाय घसरून पडल्यानंतर मेंदूत रक्तस्त्राव झाला होता. यानंतर कोल्हापुरात खासगी रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल केलं होतं. यावेळी त्यांच्यावर तातडीची शस्त्रक्रिया केली होती. शस्त्रक्रिया केल्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर पण गंभीर होती. मात्र, गेल्या पाच दिवसांपासून सुरु असलेली मृत्यूची झुंज अपयशी ठरली.
शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
पी. एन. पाटील यांच्या निधनानंतर सडोली खालसा या मूळ गावी त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याआधी राज्य सरकारच्या वतीने उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी श्रद्धांजली वाहिली. जिल्हा प्रशासनाकडून जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षकांनी श्रद्धांजली वाहिली. अंत्यसंस्कारावेळी मंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार धनंजय महाडिक, शाहू छत्रपती महाराज, संभाजीराजे, मालोजीराजे, लातूरचे आमदार धीरज देशमुख, सांगलीचे विशाल पाटील देखील उपस्थित होते. आज पहाटे साडे पाचच्या सुमारास पाटील यांची प्राणज्योत मालवली. आमदार पाटील यांच्या मुळ गावी सडोली खालसामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हा प्रशासनाला आमदार पी. एन. पाटील यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याची सूचना दिल्या होत्या.
कोल्हापूर काँग्रेस कमिटीत अंत्यदर्शन
पाटील यांचे पार्थिव कोल्हापूर काँग्रेस कमिटी कार्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यावेळी पाटील यांच्यावर प्रेम करणाऱ्या शेकडो कार्यकर्त्यांनी अंत्यदर्शनासाठी गर्दी केली होती. यावेळी श्रीमंत शाहू महाराज, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
पाटील यांच्या मुळगावी अंत्यसंस्कार
काँग्रेस कार्यालयात अंत्यदर्शन झाल्यानंतर पाटील यांचे पार्थिव सडोली खालसा या त्यांच्या मुळ गावी नेण्यात आले. यावेळी पाटील यांच्यावर प्रेम करणारा हजारोंचा जनसमुदाय अत्यंदर्शनासाठी आला होता. यावेळी जिल्ह्यातील नेते उपस्थित होते.
राजकीय नेत्यांकडून पाटील यांच्या आठवणींना उजाळा
पाटील यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यापूर्वी जिल्ह्यातील नेत्यांनी आपल्या भावना व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली. छत्रपती शाहू महाराज, मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार प्रकाश आबिटकर, धीरज देशमुख, माजी आमदार चंद्रदीप नरके आदींनी भावना व्यक्त केल्या. यावेळी गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे, माजी अध्यक्ष आबाजी पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. आमदार अमित देशमुख यांनी वडिल स्वर्गीय विलासराव देशमुख आणि पी. एन. पाटील यांच्या मैत्रीच्या आठवणी जागवल्या.
महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन ‘या’ दिवशी होणार सुरू
by
Adeditor18
December 12, 2024
अन् पैश्यांच्या जोरावर लोकशाही..; नाना पटोले
by
Adeditor18
December 12, 2024
‘हा’अभिनेता एका चित्रपटासाठी घेतो 250-300 कोटी
by
Adeditor18
December 12, 2024