कोल्हापूर (प्रतिनिधी) : सध्या राज्यात विधानसभेची रणधुमाळी आहे. विधानसभा निवडणूकीच्या रिंगणात उतरलेले उमेदवार जोमाने आपला प्रचार करत असल्याचं पहायला मिळत आहे. अशातच आता, परीख पुलाच्या पर्यायासाठी ‘कॉफी पे चर्चा’ या कार्यकर्माचे काही युवकांनी आयोजन केले होते.

‘कॉपी पे चर्चा’ या आयोजित केलेल्या कार्यकर्मातून चर्चेअंती असं ठरलं की, जो कोण पर्यायी पुलासाठी प्रयत्न करेल, समस्या जाणून घेईन तोच खरा लोकप्रतिनिधी सभागृहात पाठवावा असे एकमत यावेळी ठरवण्यात आले.

कोल्हापूर उत्तर मतदारसंघाचे उमेदवार राजेश लाटकर यांनी निवडून आल्यावर पर्यायी पुलासाठी आम्ही तुमच्याबरोबर आहे असे आश्वासन दिले. तर, मनसेचे अधिकृत उमेदवार अभिजित राऊत यांनी मुख्यमंत्री आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना आराखडा पाठवून लवकरात लवकर निधी मिळवायचा प्रयत्न करू असे प्रतिपादन केले आहे.

यावेळी फिरोज शेख, राहुल चौधरी, सुशील हंजे, सचिन जाधव, चंद्रकांत कांडेकरी, चंद्रकांत पाटील, शुभम शिरदशेट्टी, संतोष जाधव, प्रसाद साळुंखे आदी उपस्थित होते.