कोल्हापूर (प्रतिनिधी) : शारदीय नवरात्रोत्सवासाठी करवीर निवासीनी आई अंबाबाईच्या दररोज आणि उत्सव काळातील सोन्याच्या जडावी दागिन्यांची स्वच्छता रविवारी करण्यात आली. देवीसाठी बनविलेल्या सोन्याच्या पालखीचीही स्वच्छता करण्यात आली आहे. रविवारी दिवसभर देवस्थान कार्यालयाच्या शेजारील मंडपात दागिन्यांची स्वच्छता सुरू राहिल्याने सुरक्षायंत्रणा कडक केली होती.

‘या’ आभूषणांची स्वच्छता केली आहे..?


साडेतीन शक्तीपीठापैकी एक असलेल्या करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात नऊ दिवस देवीची विविध रूपांत जडावी सालंकृत पूजा बांधण्यात येते. त्याचबरोबर देवीसाठी दररोजच्या अलंकारासह नवरात्र काळात उत्सवासाठी महत्त्वाचे पारंपारिक दागिने देवीला परिधान केले जातात. यामध्ये जडावाचा किरीट, कुंडले, पान, चिंचपेटी, सात पदरी कंठी, कोल्हापुरी साज, श्रीयंत्र, सोन्याची पालखी, चौऱ्या, मोर्चल, चोपदार दंड, मोहन माळ, मंगळसूत्र, कवडयाची माळ यासह इतर आभूषणांचा समावेश आहे. या सर्व सोने दागिन्यांची मंदिरातील परंपरागत कारगिरांनी स्वच्छता केली. 6 – 7 ही स्वच्छता मोहीम सुरू होती.