पन्हाळा: (प्रतिनिधी) होमगार्ड वर्धापन सप्ताह दिनानिमित्त आज पन्हाळगडावर वृक्षारोपण स्वच्छता मोहीम राबवण्यात आली यावेळी होमगार्ड कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी पन्हाळा पोलीस ठाणे आणि परिसरातील स्वच्छता केली जवळपास 50 होमगार्ड कर्मचाऱ्यांनी समावेश घेतला होता.

हा उपक्रम पन्हाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय बोंबले ,उप निरीक्षक महेश कोंडुभौरी ,यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. यावेळी,पन्हाळा तालुका होमगार्ड समादेशक अधिकारी संग्रामसिंह भोसले होमगार्ड कर्मचारी गजानन कोळी ,अक्षय वाईंगडे, त्याचबरोबर महिला होमगार्ड कर्मचारी देखील या उपक्रमात समावेश घेतला होता.