कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : श्री भावेश्वरी चॅरिटेबल ट्रस्ट कोल्हापूर आणि प्राथमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने शहर स्तरीय शालेय वक्तृत्व स्पर्धा आज बुधवार दिनांक 15 जानेवारी रोजी मनपा नेहरूनगर विद्यामंदिर येथे पार पडल्या.
विजेत्या मुला मुलींना रोख रक्कम सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. स्पर्धेचे परीक्षक म्हणून मा. अमर भोसले सर आणि बी. एस कांबळे सर यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे नियोजन विजय सुतार सर यांनी केले.
शहरस्तरीय शालेय वक्तृत्व स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे –
मुली विभाग
प्रथम क्रमांक – आर्या दीपक चराटे
मनपा श्रीम. ल . कृ. जरग वि.नं. जरगनगर
द्वितीय क्रमांक – सिद्धी शिवाजीराव गुरख
मनपा . नेहरूनगर वि. मं. नेहरूपर
तृतिय क्रमांक – स्वरा मनिष कुमार देवडकर
मनपा श्रीम. ल. कृ. जरग वि.नं. जरगनगर
मुले विभाग
प्रथम क्रमांक – प्रणव जनार्दन ओंकार
मनपा नेहरूनगर वि . मं . कोल्हापूर
द्वितिय क्रमांक – असद रमजान मेवेकरी
मनपा श्रीम. ल. कृ. जरग वि.नं. जरगनगर
तृतिय क्रमांक – हर्षल महेश सावंत
मनपा नेहरूनगर वि . मं . कोल्हापूर.
बक्षीस वितरण समारंभास प्राथमिक शिक्षण समितीकडील शैक्षणिक पर्यवेक्षक विजय माळी साहेब, केंद्र शाळा मुख्याध्यापक नलिनी साळुंखे मॅडम, प्राथमिक शिक्षक समितीचे नेते सुधाकर सावंत आणि पुरोगामी संघटनेचे शिवाजी गुरव सर तसेच शिक्षक पालक विद्यार्थी उपस्थित होते.