कुरुंदवाड (प्रतिनिधी) : शिरढोण (ता. शिरोळ) येथील निविदातील नियम धाब्यावर बसवून रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरू केल्याने शिरढोण येथील ग्रामस्थांनी रस्त्याचे काम बंद पाडले. ठेकेदार योगेश पाटुकले कामाच्या ठिकाणी येवून चूक झाल्याचे मान्य करुन पुन्हा रस्ता उखडून नव्याने काम सुरु केल्याने आंदोलक शांत झाले.

शिरढोण – कुरुंदवाड रस्त्याचे रुंदीकरण आणि डांबरीकरण करण्याचे काम सुरू आहे. या कामाचा ठेका पाटुकले यांच्याकडे यांच्या कामाच्या दर्जाबाबत नेहमीच प्रश्न निर्माण करुन वाद निर्माण होत असतो. गेले अनेक महिने रखडलेले रस्त्याच्या डांबरीकरणाचे व रुंदीकरणाचे काम दोन दिवसापासून सुरू झाले आहे. रस्ता मजबुती करताना जेसीबी मशिनच्या सहाय्याने रस्ता उखडून घेणे आवश्यक होते. मात्र, ठेकेदाराने आहे त्याच रस्त्यावर मजबुतीकरण सुरु केल्याने येथील विश्वास बालीघाटे व सुरेश सासणे यांनी ग्रामस्थांसह निकृष्ट कामाची पाहणी करून काम बंद पाडले.

यावेळी आंदोलकांनी ठेकेदार पाटुकले यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करून धारेवर धरले. अखेर चुक मान्य करत रस्ता उखडून मजबुतीकरण करण्याचे मान्य नव्याने काम सुरू केल्याने आंदोलक शांत झाले.

यावेळी विजय मगदूम, राजू माणगावे, रामा शहापूरे, कुमार पाणदारे, महावीर माणगावे, प्रकाश शेणवाडे, मनोहर टाकवडे, ग्रामस्थ उपस्थित होते.