मुंबई – बॉलिवूड अभिनेता अजय देवगण लवकरच ‘सिंघम अगेन’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेनं प्रतीक्षा करत आहेत. अजयची सगळ्यांच्या लक्षात राहिलेली बाजीराव सिंघम या भूमिकेला आता 10 वर्ष झाली आहेत. आता त्याचा ‘सिंघम 3’ हा चित्रपट येत आहे. रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्समधील ‘सिम्बा’ आणि ‘सूर्यवंशी’ या चित्रपटांमध्ये पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली. या चित्रपटात अनेक बडे कलाकार पाहायला मिळणार आहे.
रोहित शेट्टी दिग्दर्शित अजय देवगणच्या सिंघम अगेन चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. हा सिंघम फ्रेंचायझीचा तिसरा चित्रपट असल्याने प्रेक्षकांच्या याकडे नजरा लागल्या आहेत. तगड्या स्टारकास्टमुळे सिंघम अगेन चित्रपट प्रचंड चर्चेत आहे. सिंघम अगेन चित्रपटात अजय देवगण, रणवीर सिंह, दीपिका पादुकोण, करीना कपूर, जॅकी श्रॉफ, टायगर श्रॉप आणि विलनच्या भूमिकेत अर्जून कपूर झळकणार आहे. आता या स्टारकास्टमध्ये बॉलिवूडमधील आणखी एक नाव जोडलं गेलं आहे.
‘दबंग’ फ्रेंचायझीमध्ये सलमान हा चुलबुल पांडेच्या भूमिकेत दिसणार आहे. खरंतर त्याचे दोन्ही ‘दबंग’ आणि ‘दबंग 2’ या चित्रपटांना प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. पहिल्या दोन्ही चित्रपटांच्या तुलनेत मात्र त्याचा तिसऱ्या भागाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला नव्हता. पण जर रोहित शेट्टीच्या ‘सिंघम अगेन’ या चित्रपटातून प्रेक्षकांना पुन्हा एकदा चुलबूल पांडेची एक वेगळी बाजू पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सलमानच्या
सिंघम 3′ एंट्रीसाठी चाहते