258 दिवसांच्या हंगामात दीड कोटी लिटर इथेनॉल निर्मिती ; अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांची माहिती

बेलेवाडी ( प्रतिनिधी ) – बेलेवाडी काळम्मा ता. कागल येथील सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या डिस्टिलरी प्रकल्पाच्या हंगामाची सांगता झाली. सन 2023-2024 या हंगामात या प्रकल्पामध्ये एकूण एक कोटी, 52 लाख, 30 हजार लिटर इथेनॉलची निर्मिती झाली. कारखान्याचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.

या पत्रकात मुश्रीफ यांनी पुढे म्हटले आहे, नोव्हेंबर 2022 मध्ये कारखान्याच्या विस्तारित डिस्टिलरी प्रकल्पाच्या कामाला सुरुवात झाली. नोव्हेंबर 2023 मध्ये प्रकल्प विस्तारीकरणाचे काम पूर्ण होऊन हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू झाला. या हंगामात एकूण २५८ दिवस हा प्रकल्प चालला. पेट्रोलियम कंपन्यांना एकूण 96 लाख, 28 हजार लिटरचा इथेनॉल पुरवठा झाला. तसेच; आज अखेर 46 लाख, 44 हजार लिटर रेक्टिफाइड स्पिरिट म्हणजेच आर. एस. चे उत्पादन झालेले आहे.

दरम्यान; कारखान्याच्या सहवीज प्रकल्पाची सांगता जूनमध्ये झालेली आहे. सहवीज प्रकल्पाच्या हंगामाची सुरुवात एक नोव्हेंबर, 2023 रोजी झाली होती. एकूण 216 दिवस हा प्रकल्प चालला. या प्रकल्पामध्ये एकूण दहा कोटी, 72 लाख, 31 हजार, 240 युनिटची वीज निर्मिती झाली. त्यापैकी महावितरणला एकूण सात कोटी, 64 लाख, 62 हजार, पाचशे युनिट विज निर्यात करण्यात आली. उर्वरित; तीन कोटी, दहा लाख, 46 हजार, 436 युनिटचा वापर कारखान्यात करण्यात आला.