मुंबई ( वृत्तसंस्था ) महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) नागपूर – गोवा शक्तीपीठ महामार्गाचे संरेखन अखेर निश्चित केले आहे. या संरेखनानुसार ‘शक्तिपीठ’ मार्ग आता 760 किमीऐवजी 805 किमी लांबीचा असणार आहे. याला विरोध म्हणून कोल्हापुरात मोठं जनआंदोलन छेडण्यात आलं आहे.

आमदार सतेज पाटील यांच्यासह अनेक नेत्यांनी याविरोधात आवाज उठवला आहे. यानंतर भाजप नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांनी हा मार्ग रद्द करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं म्हटल असताना याबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टविट् केलं आहे. यावरुन आता हा मुद्दा पुन्हा चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री ?

नागपूर- गोवा जोडणाऱ्या शक्तीपीठ महामार्गा विरोधात आंदोलन सुरु आहे. हे सरकार सर्वसामान्य जनतेचे आहे. त्यामुळे जनतेच्या भावनेचा विचार करुनच तसेच त्यांना विश्वासात घेऊनच प्रकल्प पुढे नेला जाईल. कुठलाही प्रकल्प जनतेवर थोपणार नाही अथवा रेटून नेणार नाही.

समृध्दी महामार्ग हा गेमचेंजर प्रकल्प आम्ही जनतेला विश्वासात घेऊनच पूर्ण केला. त्यानुसार या शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पात ज्या ठिकाणी विरोध आहे त्याची फेरआखणी करता येईल का, याचाही विचार करीत आहोत. मात्र जनतेला विश्वासात घेतल्याशिवाय कुठलाही प्रकल्प पुढे नेणार नाही.

यावरुन आता महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा वाद नव्याने रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण महायुतीच्या काही नेत्यांनी हा मार्ग रद्द होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं म्हटलं आहे. यातच आता मुख्यमंत्र्यांनी नागपूर- गोवा जोडणाऱ्या शक्तीपीठ महामार्गा विरोधात आंदोलन सुरु आहे.

हे सरकार सर्वसामान्य जनतेचे आहे. त्यामुळे जनतेच्या भावनेचा विचार करुनच तसेच त्यांना विश्वासात घेऊनच प्रकल्प पुढे नेला जाईल असं म्हटल्याने हा मार्ग होणार आहे. मात्र यामध्ये शेतकऱ्यांचा विचार केला जाईल असं म्हटलं आहे. त्यामुळे यावरुन आता पुन्हा राजकीय फैरी झडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.