मुंबई (प्रतिनिधी) : सध्या विधानसभा निवडणूकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. येत्या 20 नोव्हेंबरला विधानसभा निवडणूक होणार आहेत. यामुळे सगळीकडे विधानसभेची रेलचेल सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. राजकीय नेते आपला उमेदवारीचा अर्ज दाखल करत असलेलं पहायला मिळत आहे. अशातच आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्यातील कोपरी-पाचपाखडी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे.

एकनाथ शिंदे यांनी धर्मवीर आनंद दिघे यांचे आशीर्वाद घेत भव्य शक्तिप्रदर्शन सुरू केले आहे. त्यापूर्वी मुख्यमंत्री शिंदे यांनी संत एकनाथ महाराज यांच्या वंशज कडून आशीर्वाद देखील घेतले आहेत. रथावर महायुतीचे नेते उपस्थित आहेत. कोपरी-पाचपाखडी विधानसभा मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानसभेच्या मैदानात उतरले आहेत. थोड्याच वेळात ते आपला उमेदवारी अर्जही दाखल करणार आहेत.