सांगली ( प्रतिनिधी ) भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशकार्यकारिणी सदस्य यांच्या माध्यमातून सांगलीमध्ये उद्यम विकास औद्योगिक प्रदर्शन आणि चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या प्रदर्शनाला सोमवारी भेट देऊन सादर केलेल्या प्रकल्पांची माहिती घेतली.


चंद्रकांत पाटील सोमवारी सांगली दौऱ्यावर होते. यावेळी त्याची या औद्योगिक प्रदर्शनाला भेट दिली. यावेळी अभियांत्रिकी धोरण आणि छत्रपती शिवाजी विद्यापीठ उपकेंद्र विषयावरील आयोजित चर्चासत्रात विचार मांडले. यावेळी भारतीय पश्चिम महाराष्ट्र संघटक मंत्री मकरंद देशपांडे, दीपक बाबा शिंदे, संजय आराणके, शेखर इनामदार यांच्या सह इतर मान्यवर उपस्थित होते.