पुणे ( प्रतिनिधी ) कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील आज पुणे दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी आपल्या मतदारसंघाला भेट दिली. कार्तिकी एकादशीनिमित्त कोथरुड मतदारसंघातील केळेवाडी आणि श्रावणधारा सोसायटीतील विठ्ठल मंदिरात आयोजित काकड आरतीला चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहत विठुरायाचे दर्शन घेतले.
भक्तीचिया पोटी बोध काकडा ज्योती । पंचप्राण जीवें भावें ओवाळूं आरती ।।ओंवाळूं आरती माझ्या पंढरीनाथा माझ्या साईनाथा । दोन्ही कर जोडोनी चरणीं ठेविला माथा ।। अशा प्रकारे अभंगाच्या ओव्या म्हणत चंद्रकांत पाटील यांनी यावेळी विठुरायाची मनोभावे पूजा केली.
यावेळी सर्वांना उत्तम आरोग्य, सुख, समृद्धी आणि मनशांती लाभो अशी विठुरायाच्या चरणी प्रार्थना केली. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी फुगडी खेळण्याचा आनंद लुटला. यासोबतच त्यांनी जमलेल्या भक्तांना प्रसादाचे वाटप देखील केले.