नवी दिल्ली  (वृत्तसंस्था) : सेंट्रल बोर्ड ऑफ सेकेंडरी एज्यूकेशनने (सीबीएसई) ने १२ वीच्या प्रॅक्टिकल परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या असून  प्रॅक्टिकल परीक्षा १ जानेवारी ते ८ फेब्रुवारीदरम्यान होणार आहे.  या तारखा संभाव्य असल्याचेही सीबीएसईने म्हटले आहे. तसेच निश्चित तारखांसोबत नियमावलीही  लवकरच अधिकृत वेबसाइटवर दिली जाईल, असेही स्पष्ट केले आहे.  

प्रॅक्टिकल परीक्षांसाठी एक ऑब्जर्वर देखील नेमण्यात येणार आहे. हा ऑब्जर्वर प्रॅक्टिकल परीक्षा आणि प्रोजेक्ट्सच्या मूल्यांकनावर लक्ष्य ठेवणार आहे. प्रॅक्टिकल परीक्षांमध्ये इंटरनल आणि एक्सटर्नल असे दोन्हीही परीक्षक असणार आहेत. तसेच सीबीएसई बोर्डाने नियुक्त केलेल्या या एक्सटर्नल एग्झामिनर्सकडूनच प्रॅक्टिकल परीक्षा घेण्याची जबाबदारी संबंधित शाळांचीच असेल. सर्व शाळांना एक लिंक  दिली जाईल. त्या लिंकवर शाळांना प्रत्येक विद्यार्थ्यांचे गूण अपलोड करावे लागतील.  प्रॅक्टिकल परीक्षा आणि प्रोजेक्ट मूल्यांकनाचे काम संबंधित शाळांमध्येच होणार आहे.