आपले सरकार येणार हे काळ्या दगडावरची पांढरी रेघ : आ.रोहित पवार

सोलापूर : सध्या विधानसभा निवडणुकांचं रणांगण सुरु आहे.अवघ्या 15 दिवसांवर निवडणूका आल्या असल्यामुळे राजकारण रंगले आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीचे आ. रोहित पवार स्वत:चा मतदारसंघ सांभाळत सोलापुरात देखील सक्रिय झाले आहेत.बार्शीमध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांची ताकद वाढण्यासाठी रोहित पवार तयार आहेत.संजय शिंदे यांच्या सोबत असणाऱ्या अनेक नेत्यांनी रोहित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार… Continue reading आपले सरकार येणार हे काळ्या दगडावरची पांढरी रेघ : आ.रोहित पवार

शरद पवारांनी केला महायुतीवर गंभीर आरोप

बारामती : सध्या राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे.महायुती विरुद्ध महाविकास आघाडीमध्ये चुरशीची लढत सुरु झालेली आहे.बंडखोरीनंतर ही पहिलीच विधानसभा निवडणूक असल्यामुळे ही प्रतिष्ठेची झाली आहे.आता जेष्ठ नेते शरद पवार यांनी महायुतीवर गंभीर आरोप केले आहेत. नाशिकमधील दिंडोरी मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाने विधानसभा उपसभापती नरहरी झिरवाळ आणि देवळालीत आमदार सरोज अहिरे यांना मैदानात उतरवले… Continue reading शरद पवारांनी केला महायुतीवर गंभीर आरोप

दिलीप सोपलांनी घेतली जरांगेंची भेट..!

सोलापूर – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. दिलीप सोपल यांनी अंतरवाली सराटी येथे जाऊन मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली. विधानसभा निवडणुकीत बार्शी मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून माजी मंत्री दिलीप सोपल हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत, तर त्यांच्या विरोधात शिवसेनेकडून आमदार राजेंद्र राऊत अशी लढत आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी मनोज जरांगे पाटील आणि आमदार राजेंद्र… Continue reading दिलीप सोपलांनी घेतली जरांगेंची भेट..!

सोलापूरमध्ये तेलुगू अभिनेत्याच्याही गाजणार सभा..!

सोलापूर – भाजपाचे स्टार प्रचारक नरेंद्र मोदी, अमित शाह, योगी आदित्यनाथ हे प्रचारासाठी महाराष्ट्रात सभा घेणार आहेत. सोलापूरमध्ये देखील त्यांच्या सभा होणार आहेत. त्यांच्यासोबत तेलुगू भाषिकांची संख्या लक्षात घेऊन तेलुगू अभिनेत्यांच्या सभांचीही सोलापूरमधून मागणी होत आहे. नरेंद्र मोदी, अमित शाह, योगी आदित्यनाथ, मुरलीधर मोहोळ, जनसेना पक्षप्रमुख अभिनेते पवन कल्याण यांच्या सभांचे नियोजन केले आहे, असे… Continue reading सोलापूरमध्ये तेलुगू अभिनेत्याच्याही गाजणार सभा..!

मोहोळ विधानसभा मतदारसंघातून सिद्धी कदमांचा पत्ता कट..!

सोलापूर – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारणात अनेक ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. शरद पवार गटाने मोहोळ विधानसभा मतदारसंघामधून माजी आमदार रमेश कदम यांची कन्या सिद्धी कदम यांना उमेदवारी दिली होती. मात्र उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अचानक सिद्धी कदम यांची उमेदवारी रद्द केली. त्यानंतर मोहोळ विधानसभा मतदारसंघात राजू खरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सिध्दी कदमची… Continue reading मोहोळ विधानसभा मतदारसंघातून सिद्धी कदमांचा पत्ता कट..!

जरांगे पाटलांच्या समर्थकांनी अडवला भाजपचा उमेदवार

भोकर : विधानसभा निवडणुकीची तयारी जोरदार सुरु झालेली असून यंदाची विधानसभा निवडणूक जोरदार रंगणार आहे.त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडी पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरे जाणार आहेत.मराठवाडा आणि बीडमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थकांची संख्या मोठी आहे.मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थकांनी भाजपचा उमेदवारास रोखले.भोकर विधानसभा मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली… Continue reading जरांगे पाटलांच्या समर्थकांनी अडवला भाजपचा उमेदवार

तुळजापूरमध्ये बोगस नवीन मतदार अर्ज 40 जणांवर गुन्हा

तुळजापूर : तुळजापूर विधानसभा मतदार संघामध्ये बोगस नवीन मतदार अर्ज नोंदणी प्रकरणामध्ये 40 जणांवर पोलिसांकडे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.जिल्हाधिकारी – निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांच्या आदेशानुसार हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.तर सायबर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.मात्र या बोगस मतदार नोंदणी रॅकेटचा मास्टर माईंड कोण आहे?असा प्रश्न विचारला जात आहे.मतदार नोंदणी अर्जासोबत जोडलेल्या… Continue reading तुळजापूरमध्ये बोगस नवीन मतदार अर्ज 40 जणांवर गुन्हा

चंद्रपूरमध्ये बोगस मतदार नोंदणी होत असल्याचा महाविकास आघाडीचा आरोप

चंद्रपूर : राज्यातील एकूण 150 मतदारसंघ ठरले आहेत.तर एका ॲपच्या माध्यमातून दहा हजार मते काढून टाकली आहेत आणि त्या ठिकाणी बोगस मतदार नोंदणी करत आहेत असा गंभीर आरोप महाविकास आघाडीने केला आहे.तर हे कटकारस्थान करणारे सूत्रधार भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे असल्याचा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खा.संजय राऊत यांनी केला . तर ज्या मतदारसंघांमध्ये मतदार… Continue reading चंद्रपूरमध्ये बोगस मतदार नोंदणी होत असल्याचा महाविकास आघाडीचा आरोप

सोलापूरात 11 जागांसाठी 150 इच्छुक उमेदवार

सोलापूर – सध्या विधानसभा निवडणुकीचं रणांगण सर्वत्र पहायला मिळत आहे. मराठा समाजाकडून सोलापूर जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघांतून निवडणूक लढविण्यास 150 जण इच्छुक आहेत. त्यांचा मेळावा शनिवारी झाला. त्या इच्छुकांच्या मुलाखती रविवारी (दि. 20) अंतरवाली सराटी येथे होणार आहे. त्यावेळी उमेदवारांची नावे जाहीर होण्याची शक्यता असल्याची माहिती सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार यांनी पत्रकार परिषदेत… Continue reading सोलापूरात 11 जागांसाठी 150 इच्छुक उमेदवार

स्वामी समर्थांच्या दरबारात डिजिटल मिडियाची कृतज्ञता!

अक्कलकोट (प्रतिनिधी) : कोजागिरी पौर्णिमा दिनी डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी श्री.स्वामी समर्थांच्या दरबारात दर्शन घेत राज्यातील डिजिटल मिडियाचे प्रश्न मार्गी लागत असल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी मंदिर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे, अन्नछत्र मंडळाचे अध्यक्ष अमोल राजे भोसले आणि डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचे तालुकाध्यक्ष मारुती बावडे यांनी श्री.स्वामी… Continue reading स्वामी समर्थांच्या दरबारात डिजिटल मिडियाची कृतज्ञता!

error: Content is protected !!