एसटीच्या ताफ्यातून शिवशाहीचा प्रवास संपणार..?

मुंबई (प्रतिनिधी) : लालपरीचा प्रवास म्हणजे सर्वसामान्यांसाठी खूप सोयीचा आहे. एसटी महामंडळाने आपल्या ताफ्यात अनेक बस दाखल केल्या आहेत. यामध्ये शिवशाही, शिवनेरी, एसी बससारख्या अनेक बस खेडोपाड्यात धावत असतात. मात्र, आता एसटी महामंडळाने मोठा निर्णय घेतला आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यातून आता शिवशाहीचा प्रवास संपणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या बसच्या वाढत्या अपघाताच्या… Continue reading एसटीच्या ताफ्यातून शिवशाहीचा प्रवास संपणार..?

सांगली पुन्हा हादरले : एका तरुण कबड्डीपटूचा खून

सांगली (प्रतिनिधी) : सांगलीतील जामवाडी येथे राहणाऱ्या अनिकेत तुकाराम हिप्परकर (वय 22, रा. जामवाडी, सांगली) या कबड्डीपटूचा पुर्ववैमनस्यातून खून करण्यात आला. अनिकेत हा एका संस्थेत पिग्मी एजंट म्हणून काम करीत होता. अनिकेतचा कांही महिन्यांपूर्वी हनुमान जयंतीवेळी मंडळातील काही मुलांशी वाद झाला होता. या कारणामुळे जामवाडीतील मरगुबाई मंदिराजवळ अनिकेत थांबला असता या मुलांनी पूर्वी झालेल्या वादाचा… Continue reading सांगली पुन्हा हादरले : एका तरुण कबड्डीपटूचा खून

पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना आजपासून टोलमाफी

मुंबई : अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या विठूरायाच्या भेटीसाठी महाराष्ट्रातील वारकरी टाळ-मृदुंगाचा गजर करत, विठ्ठल भक्तीत तल्लीन होऊन मुखी हरिनामाचा जप करत पंढरीच्या दिशेने जात आहे. ऊन, पाऊस, वाऱ्यासह निसर्गाच्या विविध संकटांचा सामना करत वारकरी पंढरीकडे पाऊलं टाकत आहेत. तर राज्यशासनाने वारकऱ्यांसाठी हजारो बस पंढरीच्या वारीसाठी सोडल्या आहेत. शिवाय अनेक वारकरी आपल्या खासगी वाहनाने पंढरीच्या… Continue reading पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना आजपासून टोलमाफी

फ्रान्समध्ये सापडली छत्रपती शिवाजी महाराजांची बखर..

मुंबई (प्रतिनिधी) : फ्रान्समध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची बखर सापडली आहे. पुण्यातील संसोधक गुरुप्रसाद कानिटकर आणि मनोज दाणी यांना ही बखर सापडली आहे. ‘नॅशनल लायब्ररी ऑफ फ्रान्स’मध्ये इतिहास संशोधनासाठी लागणारी काही जुनी कागदपत्रे तसेच पुस्तकं चाळत असताना यांनाछत्रपती शिवाजी महाराजांची जुनी अप्रकाशित बखर सापडली आहे. ही बखर मोडी लिपीतील आहे. हस्तलिखित स्वरूपात असलेली ही बखर शके… Continue reading फ्रान्समध्ये सापडली छत्रपती शिवाजी महाराजांची बखर..

खाते वाटप : ‘या’ मंत्र्यांची लागली पहिल्या यादीला वर्णी

xr:d:DAFm_qilVdY:4,j:6879643152071733230,t:23062707

दिल्ली (वृत्तसंस्था) : लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर री एनडीएचा शपथविधी सोहळा राष्ट्रपती भवन येथे पार पडला. यावेळी पंतप्रधानांसह एकूण 72 मंत्र्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पद व गोपनीयतेची शपथ दिली. दरम्यान, शपथविधी पार पडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी खातेवाटप करण्यात आलं आहे. यामध्ये नितीन गडकरी यांच्याकडे पुन्हा एकदा रस्ते वाहतूक खातं देण्यात आलं आहे. मोदी सरकार 3.0 च्या… Continue reading खाते वाटप : ‘या’ मंत्र्यांची लागली पहिल्या यादीला वर्णी

उद्या मिरजेत होणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्याला काँग्रेस अलिप्त…

सांगली (प्रतिनिधी) : सांगली लोकसभेच्या जागेसाठी ठाकरे शिवसेनेने धरलेला आग्रह जिल्ह्यातील काँग्रेसला मान्य नाही. यामुळे उद्या (गुरुवार) उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मिरजेत होणाऱ्या जनसंवाद मेळाव्यापासून अलिप्त राहण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. या मेळाव्यासाठी महाविकास आघाडीतील मित्र पक्ष म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादीलाही निमंत्रण देण्यात आले आहे. त्यामुळे शरद पवार पक्षाचे पदाधिकारी या मेळाव्याला उपस्थिती लावणार आहेत.… Continue reading उद्या मिरजेत होणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्याला काँग्रेस अलिप्त…

पत्रकारास धक्काबुक्की करणे भोवले; सोलापूर जिल्ह्यातील पहिला गुन्हा दाखल…

बार्शी (प्रतिनिधी) : जबाबदारी पार न पाडण्याबाबत वार्तांकन केल्याचा राग मनात धरून पत्रकारास धमकी देऊन धक्काबुक्की करत वार्तांकनास अडथळा निर्माण केल्याप्रकरणी एकावर पत्रकार संरक्षण कायदयांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. किरण माने, प्रोजेक्ट मॅनेजर, स्वयम शिक्षण प्रयोग (रा. धाराशिव) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. 2017 साली अस्तित्वात आलेल्या पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत दाखल झालेला सोलापूर… Continue reading पत्रकारास धक्काबुक्की करणे भोवले; सोलापूर जिल्ह्यातील पहिला गुन्हा दाखल…

‘सिकंदर’ ठरला सलग दुसऱ्या वर्षी ‘भीमा केसरी’चा मानकरी…

सोलापूर (प्रतिनिधी) : प्रेक्षकांनी गजबजलेल्या टाकळी सिकंदरच्या भीमा केसरी कुस्ती मैदानात, मोहोळच्या पै.सिकंदर शेख याने पंजाबच्या पै. प्रदिपसिंगला एकचाक डावावर आस्मान दाखवत, भीमा केसरीचा बहुमान व चांदीची गदा पटकावली. तसेच महेंद्र गायकवाडने देखील उत्तम खेळ दाखवत, पंजाबच्या पै. दिनेश वर विजय मिळविला. भीमा कारखान्याचे अध्यक्ष विश्वराज महाडिक यांनी भरविलेल्या या कुस्त्यांच्या मैदानात, सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील… Continue reading ‘सिकंदर’ ठरला सलग दुसऱ्या वर्षी ‘भीमा केसरी’चा मानकरी…

अखेर मनोज जरांगे-पाटील यांची कुणबी नोंद सापडली…

पुणे (प्रतिनिधी) : मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील यांची कुणबी नोंद सापडल आहे. शिरूरच्या तहसील कार्यालयामध्ये मोडी लिपीमध्ये ही नोंद आढळून आली आहे. यामुळे मनोज जरांगे पाटील यांना कुणबी दाखला मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मोडी लिपी संशोधन करणारे पथक शिरूर दौऱ्यावर आले होते. त्यादरम्यान त्यांना मनोज जरांगे पाटील यांचे वडील कुणबी… Continue reading अखेर मनोज जरांगे-पाटील यांची कुणबी नोंद सापडली…

करकंब येथे शाळा-मदरसामध्ये विद्यार्थ्यांसह शिक्षकांना अन्नातून विषबाधा…!

पंढरपूर (प्रतिनिधी) : करकंब येथील मौलाना आझाद न्यू इंग्लिश स्कूल आणि आरमी मदरसामध्ये 29 विद्यार्थ्यासह दोन शिक्षकांना शिळ्या अन्नातून विषबाधा झाली. त्यांना करकंब येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेने करकंब आणि परिसरातील शिक्षणक्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, करकंब येथील मौलाना आझाद न्यू इंग्लिश स्कूल आणि आरमी मदरसामधील विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना… Continue reading करकंब येथे शाळा-मदरसामध्ये विद्यार्थ्यांसह शिक्षकांना अन्नातून विषबाधा…!

error: Content is protected !!