मक्का : हज यात्रेदरम्यान बळींची संख्या 1000 पार; याला जबाबदार कोण ?

( आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था ) सौदी अरेबियातील कडाक्याच्या उन्हामुळे यंदा हज यात्रेकरूंपैकी अनेकांना मृत्यूला सामोरे जावे लागले आहे. या हजदरम्यान मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 1000 च्या पुढे गेली आहे. मृतांचा आकडा वाढत असताना सौदी अरेबियातील या मृत्यूंना जबाबदार कोण ? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. कडक उष्मा किंवा हाजींची मोठी गर्दी. सौदी अरेबियात सोशल मीडियावर अशी… Continue reading मक्का : हज यात्रेदरम्यान बळींची संख्या 1000 पार; याला जबाबदार कोण ?

शिवसेनेच्या वतीने “शिवराज्याभिषेक सोहळा” उत्साहात संपन्न

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले आणि राज्याभिषेक करून हिंदूंच्या गुलामगिरीच्या मानसिकतेला छेद दिला व समाजात अस्मितेची द्वाही फिरविली, यातून महाराजांनी केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशातील सर्व भूमिपुत्रांना, या देशात आता भूमिपुत्रांचे राज्य निर्माण झाले आहे, असे आश्वस्त केले. शिवराज्याभिषेक सोहळा हा तमाम शिवभक्तांसाठी पर्वणीच असते. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छ. शिवाजी महाराज… Continue reading शिवसेनेच्या वतीने “शिवराज्याभिषेक सोहळा” उत्साहात संपन्न

अष्टपैलू डॉ. बाबासाहेब आंबेडकर

असित बनगे : कोल्हापूर सोनियाची उगवली सकाळ उगवली सकाळ, जन्मास आले भीमबाळ खरचं आजचा दिवस 14 एप्रिल हा समस्त दीन दलितांसाठी,शोषित वर्गासाठी, हजारो वर्षे गुलामगिरीत खितपत पडलेल्या वंचितांसाठी सोन्याचाच दिवस होता. कारण त्यांच्या उद्धारकाने आज जन्म घेतला. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म 14  एप्रिल 1891  रोजी महू या गावी झाला. सुभेदार रामजी हे बाबासाहेबांचे वडील तर भीमाबाई… Continue reading अष्टपैलू डॉ. बाबासाहेब आंबेडकर

शिवाजी विद्यापीठात परदेशी विद्यार्थ्यांनी साजरी केली दिवाळी

कोल्हापूर : यंदाही शिवाजी विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयांमध्ये प्रवेशित झालेल्या परदेशी विद्यार्थ्यांकरिता विद्यापीठाच्या इंटरनॅशनल अफेअर्स सेल मार्फत दिवाळी उत्सवचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमस्थळी आर्कषक रांगोळी, विविध ठिकाणी आकाश कंदील लावून सजावट करण्यात आलेली होती. सुरूवातीस परदेशी विद्यार्थ्यांकडून तसेच कुलगुरू डॉ.दिगंबर शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या हस्ते पणत्या प्रज्वलित करण्यात आल्या. कुलगुरू डॉ.… Continue reading शिवाजी विद्यापीठात परदेशी विद्यार्थ्यांनी साजरी केली दिवाळी

सणासुदीत ट्रव्हल्सचा दर वाढल्यास तक्रार करा; परिवहन विभागाने केले आवाहन

मुंबई ( प्रतिनिधी ) सणाच्यानिमित्ताने अनेक नागरिकांना प्रवास करावा लागतो. या प्रवासासाठी खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो. काही दिवसांवर दिवाळी असल्याने या हंगामात जादा भाडे आकारणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवाशांनी तक्रार केल्यास कारवाई केली जाईल असा इशारा प्रादेशिक परिवहन विभागाने खासगी प्रवासी वाहतूकदारांना दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्य महामार्ग परिवहन महामंडळाने त्या त्या… Continue reading सणासुदीत ट्रव्हल्सचा दर वाढल्यास तक्रार करा; परिवहन विभागाने केले आवाहन

कोल्हापूरच्या शाही दसऱ्यास मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) करवीर छत्रपती घराण्याच्या उज्वल परंपरेची साक्ष म्हणजे ‘कोल्हापूरचा दसरा’. कोल्हापूरचा शाही दसरा हा संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. म्हैसूर पाठोपाठ कोल्हापूरच्या दसऱ्याला मान आहे. संस्थान काळात हा शाही दसरा अतिशय उत्साही वातावरणात साजरा होत असे. आजही या महोत्सवाचे वैभव कायम आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या सोहळ्यात सहभाग… Continue reading कोल्हापूरच्या शाही दसऱ्यास मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती

ललितापंचमी सोहळा उत्साहात, कोहळ्यासाठी पोलीस-भाविकांमध्ये धक्काबुक्की

कोल्हापूर : अंबामातेचा अखंड जयघोष आणि भक्तिमय वातावरणात आज करवीर निवासिनी अंबाबाई, तुळजाभवानी आणि त्र्यंबोली देवीच्या भेटीचा रम्य सोहळा विधिवत पार पडला. अश्विन शुद्ध पंचमी म्हणजे ललितापंचमी आज उदंड उत्साहात पार पडली. दरम्यान कोहळा फोडल्यानंतर कोहळ्याचा तुकडा मिळवण्यासाठी पोलीस आणि भाविकांमध्ये जोरदार धक्काबुक्की झाली. त्यामुळे मंदिरात काहीकाळ गोंधळ उडाला होता.  सोहळ्यानंतर परंपरेने कुमारिकेच्या हस्ते कोहळारुपी… Continue reading ललितापंचमी सोहळा उत्साहात, कोहळ्यासाठी पोलीस-भाविकांमध्ये धक्काबुक्की

बहुप्रतिक्षित नवी मुंबई मेट्रोची प्रतिक्षा संपणार; उद्घाटन सोहळा ***

नवी मुंबई ( प्रतिनिधी ) बहुप्रतिक्षित नवी मुंबई मेट्रोची प्रतिक्षा आता संपली आहे. मुंबईकरांचे हे स्वप्न लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे. कारण नवरात्रीच्या दिवशी नारी शक्ती सन्मान सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रो सेवेचे उद्घाटन होऊ शकते. मिळालेल्या माहितीनुसार रायगडचे जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच खारघरमध्ये बैठक पार पडली आहे. मात्र, यावेळी उद्घाटन… Continue reading बहुप्रतिक्षित नवी मुंबई मेट्रोची प्रतिक्षा संपणार; उद्घाटन सोहळा ***

कृष्णा वेणी यात्रा भरण्याच्या वादावर तोडगा आवश्यक

कुरुंदवाड (प्रतिनिधी) : महाशिवरात्रीला येथील पंचगंगा-कृष्णा घाट रस्त्यावर कृष्णा वेणी यात्रा भरते; मात्र गेल्या चार वर्षांपासून यात्रेसाठी जागा देण्यावरून शेतकरी आणि यात्रा कमिटी यांच्यात न्यायालयीन वाद सुरू आहे. यात्रा अवघ्या महिन्यावर येऊन ठेपली असतानाही अद्यापही यात्रेबाबत कोणताच निर्णय घेतला नाही. त्यामुळे यात्रेच्या तोंडावरच यात्रा भरण्यावरुन शेतकरी आणि यात्रा कमिटी यांच्यात वाद निर्माण होण्यापूर्वीच पालिका आणि… Continue reading कृष्णा वेणी यात्रा भरण्याच्या वादावर तोडगा आवश्यक

गगनगडावरील उरूस-उत्सवाची तयारी पूर्ण

गगनबावडा (प्रतिनिधी) : येथील गगनगडावरील हजरत गैबीपीर व श्री विठ्ठलाई देवीचा उरूस-उत्सव गुरुवारी (दि.१२) होत आहे. या उरूस-उत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. गगनगडावरील गैबी दर्गा व विठ्ठलाई देवीच्या चौथऱ्याची साफसफाई आणि रंगरंगोटी शिवाय गैबी दर्ग्यावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. गुरुवारी दुपारी तीन वाजता गलेफ मिरवणूक गगनगडावर नेण्यात येणार आहे. प्रमुख मार्गावरून फिरून ही… Continue reading गगनगडावरील उरूस-उत्सवाची तयारी पूर्ण

error: Content is protected !!