महामंडळासह १३ ठराव मंजूर..

कोल्हापूर (प्रतिनिधी) : येथील हॉटेल पॅव्हेलियनमधील राज्यस्तरीय ब्राह्मण गोलमेज परिषदेत ब्राह्मण समाजाला आर्थिक महामंडळ देण्यासह १३ ठराव मंजूर करण्यात आले आहेत. निखिल लातूरकर अध्यक्षस्थानी होते. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना ब्रह्ममित्र पुरस्कार जाहीर करण्यात आला. परिषदेत काकासाहेब कुलकर्णी यांनी ब्राह्मण समाजाच्या विविध मागण्यांचे निवेदन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे दिल्याचे सांगितले. ब्राह्मण… Continue reading महामंडळासह १३ ठराव मंजूर..

जिल्ह्यातील ‘ती’ मोहीम राज्यात…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : ‘मास्क नाही तर प्रवेश नाही’, ही कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सुरू केलेली मोहीम आता राज्यभर पोहचली आहे. नगरविकास विभागाने या मोहिमेचा शासन निर्णयही काढला आहे. राज्यात ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहीम सुरु केली आहे. या मोहिमेंतर्गत जिल्हाधिकारी देसाई यांनी ‘मास्क नाही मग प्रवेश नाही’, ‘मास्क नाही तर वस्तू नाही’, ‘सामाजिक अंतर… Continue reading जिल्ह्यातील ‘ती’ मोहीम राज्यात…

दिवाळीनंतर शाळा सुरू..?

मुंबई (प्रतिनिधी) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील संपूर्ण कामकाज ठप्प होते. पण अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर अनेक उद्योगधंदे हळूहळू सुरु होत आहेत. असे असले तरीही शाळा-कॉलेजेस मात्र अजूनही बंदच आहेत. राज्यातील शाळा दिवाळी नंतरच सुरू करण्याचा सरकारचा विचार आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षा लक्षात घेऊन शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा… Continue reading दिवाळीनंतर शाळा सुरू..?

केंद्रीय अर्थ मंत्रालयाचा करदात्यांना दिलासा !

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय अर्थ मंत्रालयानं आयकर भरण्यासाठीच्या कालावधीत वाढ केली आहे. आयकर भरण्यासाठी केंद्रानं आधी ३० नोव्हेंबरपर्यंत कालावधी निश्चित केला होता. त्याला त्याला पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली. केंद्र सरकारनं घेतलेल्या या निर्णयामुळे कोरोना व लॉकडाउनमुळे आर्थिक समस्यांना तोंड देत असलेल्या करदात्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयानं वैयक्तिक आयकरदात्यांना २०१९-२० या… Continue reading केंद्रीय अर्थ मंत्रालयाचा करदात्यांना दिलासा !

राज्यातील सर्व नागरिकांना कोरोनाची लस देणार मोफत !

औरंगाबाद (प्रतिनिधी) : राज्यात सध्या कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊ लागली असली तरी अद्याप धोका टळलेला नाही. त्यामुळे सरकारकडून वारंवार सुरक्षित वावराचे नियम पाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे. कोरोना प्रतिबंधक लसीसाठी आटोकाट प्रयत्न सुरू आहेत. ही लस कधी मिळणार हे निश्चित नसले तरी राज्य सरकारने मात्र सर्व नागरिकांना मोफत लस दिली जाईल, अशी घोषणा केली… Continue reading राज्यातील सर्व नागरिकांना कोरोनाची लस देणार मोफत !

नवरात्रोत्सवाचा सातवा दिवस : करवीरनिवासिनी श्री अंबामातेची महापूजा – ‘अगस्त्य’कृत सरस्वती स्तवन स्वरूपात (व्हिडिओ)

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शारदीय नवरात्रोत्सवाच्या सातव्या दिवशी आज (शुक्रवार) करवीरनिवासिनी श्री अंबामातेची अगस्त्यकृत सरस्वती स्तवन स्वरुपात महापूजा बांधण्यात आली. करवीर माहात्म्य हा ग्रंथ उलगडतो तो अगस्ती आणि लोपामुद्रा ऋषी दाम्पत्याच्या संवादातून. श्रींची पालखी आजही ज्या घाटी दरवाजाजासमोरील दीपमाळेला प्रदक्षिणा घालते, तिथे या दोघांच्या मूर्ती आहेत. करवीरात एके काळी प्रचलित असलेल्या श्री विद्या म्हणजेच श्री यंत्र… Continue reading नवरात्रोत्सवाचा सातवा दिवस : करवीरनिवासिनी श्री अंबामातेची महापूजा – ‘अगस्त्य’कृत सरस्वती स्तवन स्वरूपात (व्हिडिओ)

आता पोलिसांचा पगार ‘एचडीएफसी’ बँकेतून…

मुंबई (प्रतिनिधी) : मंत्रालयीन कर्मचारी आणि मुंबई पोलिसांचे पगार आता एचडीएफसी बॅंकेत जमा होणार आहेत. या बँकेकडून पोलिसांना आता लाखो नाही तर कोट्यवधींचे विमा संरक्षण मिळणार आहे. अ‍ॅक्सिस बँकेशी झालेल्या कराराची मुदत संपल्यानंतर आता एचडीएफसी बॅंकेशी राज्य सरकारने करार केला आहे.  देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना २०१५ साली अ‍ॅक्सिस बँकेत मुंबई पोलिसांचे पगार करण्याबाबत करार करण्यात… Continue reading आता पोलिसांचा पगार ‘एचडीएफसी’ बँकेतून…

नाथाभाऊंनंतर कन्येचाही भाजपला रामराम !

जळगाव (प्रतिनिधी) : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी आज (बुधवार) भाजपचा राजीनामा देऊन राष्ट्रवादीत जाण्याची घोषणा केली. त्यानंतर काही वेळाने त्यांच्या कन्या आणि जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे यांनीही भाजप सदस्यत्वाचा राजीनामा देऊन आपणही राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे सांगितले.   रोहिणी खडसे यांनी एका वृत्तवाहिनीला सांगितले की, मी देखील सक्रिय… Continue reading नाथाभाऊंनंतर कन्येचाही भाजपला रामराम !

घरगुती वीज बिल माफीसाठी ‘जिल्हा कार्यालयाला ताला ठोको’ आंदोलन

इचलकरंजी (प्रतिनिधी) : ‘दरमहा ३०० युनिटसच्या आत वीज वापर असणाऱ्या राज्यातील सर्व घरगुती वीज ग्राहकांची लॉकडाऊन काळातील ६ महिन्यांची संपूर्ण वीज देयके माफ करण्यात यावीत, व त्या रकमेची भरपाई राज्य सरकारने करावी. अंतिम निर्णय होईपर्यंत घरगुती वीज बिले भरणार नाही आणि वीज पुरवठा तोडू देणार नाही’, अशा घोषणा करून या मागणीसाठी राज्यात सर्व जिल्ह्यांत महावितरण… Continue reading घरगुती वीज बिल माफीसाठी ‘जिल्हा कार्यालयाला ताला ठोको’ आंदोलन

शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही : मुख्यमंत्री

मुंबई (प्रतिनिधी) : शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राजकारण करायचे नाही. केंद्राकडे राज्याचे देणे बाकी आहे. येणे आले तर हात पसरावे लागणार नाही. विरोधकांनी त्यावर राजकारण करत बसू नये. शेतकऱ्यांसाठी जे जे करावे लागेल ते करू. दोन-चार दिवस दौरे करणार आहे. माहिती घेत आहे. त्यानंतर शक्य तेवढी मदत करू. हे तुमचं सरकार. शेतकऱ्यांना सरकार वाऱ्यावर सोडणार नाही, अशी… Continue reading शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही : मुख्यमंत्री

error: Content is protected !!