उद्या रात्रीपासून १५ दिवस राज्यात संचारबंदी : मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यभरात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. कोरोनाने मृत झालेल्यांची संख्याही वाढत आहे. या पार्श्वभूमीवर परिस्थिती आणखी हाताबाहेर जाऊ नये, अधिकाधिक नागरिक बाधित होऊ नयेत, संसर्गाची साखळी तोडण्याच्या उद्देशाने यासाठी राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. ही संचारबंदी १४ एप्रिलच्या रात्री ८ पासून ३० एप्रिलच्या रात्रीपर्यंत असेल, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव… Continue reading उद्या रात्रीपासून १५ दिवस राज्यात संचारबंदी : मुख्यमंत्र्यांची घोषणा

‘गोकुळ’च्या उमेदवारीसाठी ‘चंदगड’मध्ये रस्सीखेच…

कोल्हापूर (उत्तम पाटील) : गोकुळची निवडणूक ही सत्ताधारी आणि विरोधक नेत्यांच्या अटीतटीची आणि अस्तित्वाचा फैसला करणारी ठरणार आहे. या निवडणुकीच्या निकालावरून जिल्ह्याची राजकीय वाटचाल ठरणार आहे, हे मात्र नक्की. प्रत्येक तालुक्यातील उमेदवारांची निवड ही फक्त दूध संस्थांचे ठराव आणि राजकीय ताकद यावरच होण्याची दाट शक्यता आहे. या निवडणुकीत चंदगड तालुक्यातील ठरावधारक मात्र गोकुळच्या पॅनेलच्या विजयाची… Continue reading ‘गोकुळ’च्या उमेदवारीसाठी ‘चंदगड’मध्ये रस्सीखेच…

लॉकडाऊनची घोषणा ‘आज’च ? ; मुंबईच्या पालकमंत्र्यांचे संकेत

मुंबई (प्रतिनिधी) : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने कठोर  निर्बंधासह वीकेंड लॉकडाऊनचा प्रयोग केला. परंतु कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी संपूर्ण लॉकडाऊन लावण्याची तयारी राज्य सरकारने पूर्ण केली आहे. त्यामुळे लॉकडाऊनची घोषणा आजच (मंगळवार) होण्याची शक्यता आहे. याबाबतचे संकेत मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिले आहेत. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही. यावर सर्वच अधिकारी, डॉक्टरांसह… Continue reading लॉकडाऊनची घोषणा ‘आज’च ? ; मुंबईच्या पालकमंत्र्यांचे संकेत

राज्य सरकारने दहावी, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या…

मुंबई (प्रतिनिधी) : कोरोनाच्या वाढत्या उद्रेकामुळे राज्य सरकारने दहावी आणि बारावीची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. दहावीची परीक्षा जूनमध्ये आणि बारावीची परीक्षा मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात होणार आहेत. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आज (सोमवार) दुपारी दिली.

अखेर रेमडेसीवर इंजेक्शनच्या निर्यातीवर बंदी…

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सध्या अक्षरश: थैमान घातलं आहे. दररोज मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळून येत आहेत, शिवाय रुग्णांच्या मृत्यूसंख्येतही वाढ सुरूच आहे. अनेक रुग्णांना आवश्यक असलेलं रेमडेसीवर इंजेक्शन उपलब्ध होत नसून, रुग्णांच्या नातेवाईकांना या इंजेक्शनसाठी भटकंती करावी लागत आहे. तसेच, या इंजेक्शनचा काळाबाजार सुरू असल्याचंही बोललं जात होतं. या पार्श्वभूमीवर आता… Continue reading अखेर रेमडेसीवर इंजेक्शनच्या निर्यातीवर बंदी…

राज्यातील कडक लॉकडाऊनबाबतचा निर्णय दोन दिवसांत : मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यभरात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे राज्यातील आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण पडला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने वीकएंड लॉकडाऊनची घोषणा केली. शुक्रवार रात्रीपासून त्याची कडक अंमलबजावणी सुरू आहे. जनतेने त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर आज (शनिवार) सायंकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली. या बैठकीत राज्यात कडक… Continue reading राज्यातील कडक लॉकडाऊनबाबतचा निर्णय दोन दिवसांत : मुख्यमंत्र्यांची घोषणा

काँग्रेस आमदाराचे मुंबईत कोरोनामुळे निधन

नांदेड (प्रतिनिधी) : नांदेड जिल्ह्यातील देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर (वय ५५) यांचे कोरोनामुळे शुक्रवारी रात्री निधन झाले. त्यांच्यावर मुंबईतील एका रुग्णालयात उपचार उपचार सुरू असतानाच  त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काँग्रेसचे मंत्री अशोक चव्हाण यांनी ट्‌विट करून त्यांच्या निधनाची माहिती दिली आहे. आमदार रावसाहेब अंतापूरकर यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांना नांदेडमधील रुग्णालयात… Continue reading काँग्रेस आमदाराचे मुंबईत कोरोनामुळे निधन

सुप्रीम कोर्टाचा अनिल देशमुखांसह राज्य सरकारला झटका…

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सीबीआय चौकशी टाळण्याचा प्रयत्न करणारे राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. न्यायालयाने महाविकासआघाडी सरकारने केलेली याचिकाही फेटाळून लावली आहे. परमबीरसिंह यांनी १०० कोटींच्या वसुलीचा आरोप केल्याप्रकरणात आपली बाजू ऐकूनच घेतली नाही. त्यामुळे सीबीआयकडून होऊ घातलेली आपली चौकशी रोखावी, अशी मागणी अनिल देशमुख यांनी केली होती. मात्र,… Continue reading सुप्रीम कोर्टाचा अनिल देशमुखांसह राज्य सरकारला झटका…

आता खाजगी, सरकारी कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्येच मिळणार कोरोना प्रतिबंधक लस…

मुंबई (प्रतिनिधी) : आता कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी कोणत्याही खासगी किंवा सरकारी कोरोना सेंटरवर किंवा रुग्णालयात जाण्याची गरज नाही. ४५ वर्षांवरील व्यक्तीला तो काम करीत असलेल्या खाजगी किंवा सरकारी ऑफिसमध्येच लस मिळणार आहे. कामाच्या ठिकाणी कोरोना लसीकरण राबवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. याबाबत अधिसूचनाही जारी करण्यात आली आहे. खासगी आणि सरकारी कार्यालयात कोरोना लसीकरण… Continue reading आता खाजगी, सरकारी कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्येच मिळणार कोरोना प्रतिबंधक लस…

सरकार व्यावसायिकांच्या विरोधात नाही, दोन दिवसांत सकारात्मक निर्णय घेऊ : मुख्यमंत्री

मुंबई (प्रतिनिधी) : राज्य सरकारने लॉकडाऊन किंवा निर्बंधांचे पाऊल कोरोनाची लाट थोपवण्यासाठी उचलण्यात आले आहे. सरकार व्यापारी, व्यावसायिकांविरोधात नाही. त्यांचे नुकसान होऊ नये अशीच भूमिका आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनीही या लढ्यात शासनाला सहकार्य करावे. व्यापाऱ्यांनीही कोरोना नियमांचे काटेकोर पालन करावे लागेल. त्यांच्या मागण्या, सूचनांचा गांभिर्याने विचार करून उपाय योजना केल्या जातील, दोन दिवसांत यावर सकारात्मक निर्णय… Continue reading सरकार व्यावसायिकांच्या विरोधात नाही, दोन दिवसांत सकारात्मक निर्णय घेऊ : मुख्यमंत्री

error: Content is protected !!