IMD: महाराष्ट्रात येत्या 24 तासात मुसळधार; ‘या’ जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट

चेन्नई ( वृत्तसंस्था ) बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या दाबाच्या क्षेत्राचे शनिवारी तीव्र दाब क्षेत्रात रूपांतर झाले. त्यामुळे त्याचे आता चक्री वादळात रूपांतर झाले आहे. त्यामुळे 3 डिसेंबर ते 5 डिसेंबरपर्यंत देशभरात मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. अनेक भागात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. चक्रीवादळामुळे भारतीय हवामान विभागाने तमिळनाडू, आंध्र… Continue reading IMD: महाराष्ट्रात येत्या 24 तासात मुसळधार; ‘या’ जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट

IMD- पश्चिम महाराष्ट्रासह राज्यातील ‘या’ जिल्ह्यात पावसाची शक्यता…!

मुंबई ( प्रतिनिधी ) भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) जारी केलेल्या इशाऱ्यानुसार, महाराष्ट्राच्या विविध भागात पाऊस झाला आहे (महाराष्ट्र हवामान अंदाज). बुधवारी कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाऊस झाला. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार, येत्या काही तासांत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामध्ये पुणे, सातारा, अहमदनगर, कोल्हापूर,… Continue reading IMD- पश्चिम महाराष्ट्रासह राज्यातील ‘या’ जिल्ह्यात पावसाची शक्यता…!

तामिळनाडू केरळसह महाराष्ट्रात पावसाची शक्यता..!

मुंबई ( प्रतिनिधी ) तामिळनाडू आणि केरळसह अनेक भागात पाऊस पडत आहे. दरम्यान, 8 नोव्हेंबर ते 11 नोव्हेंबर दरम्यान मुंबई आणि परिसरात पावसाची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. पाऊस पडल्यास मुंबईकरांना प्रदूषणापासून दिलासा मिळू शकतो. ज्यामुळे हवेची गुणवत्ता सुधारण्यास देखील मदत होणार आहे. सध्या मुंबईतील प्रदूषणाची स्थिती अशी आहे की, लोकांना श्वास घेणे कठीण… Continue reading तामिळनाडू केरळसह महाराष्ट्रात पावसाची शक्यता..!

पाकिस्तान दिल्लीच्या हवेत विष कालवत आहे ! भारतात आणीबाणीसारखी स्थिती

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) दिल्लीतील धुराचे कारण पाकिस्तान आहे का ? तुम्हाला हे थोडे अनावश्यक वाटेल पण पाकिस्तानी मीडिया स्वतः हे सिद्ध करत आहे. एकीकडे दिल्ली आणि एनसीआर धुक्याच्या गर्द चादरीने व्यापले आहे, तर दुसरीकडे शेजारी देश पाकिस्तानचे लाहोरही त्याच्याशी झुंजत आहे. भारतातील पंजाबला लागून असलेल्या लाहोरमध्येही धुक्यामुळे सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. लोक… Continue reading पाकिस्तान दिल्लीच्या हवेत विष कालवत आहे ! भारतात आणीबाणीसारखी स्थिती

पर्यावरणपूरकतेकडे जागतिक समुदायाचा कल वाढणे गरजेचे: डॉ. राजनीश कामत

शिवाजी विद्यापीठामध्ये ‘ग्यान’ कार्यशाळेचा समारोप कोल्हापूर : अक्षय ऊर्जेचा वापर वाढवून पर्यावरणपूरकता जपण्याकडे जागतिक समुदायाचा कल वाढविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांनी केले. शिवाजी विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित पाचदिवसीय ‘ग्यान’ कार्यशाळेचा समारोप शुक्रवारी झाला. समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून कुलगुरू डॉ. कामत बोलत होते. राष्ट्रीय रासायनिक… Continue reading पर्यावरणपूरकतेकडे जागतिक समुदायाचा कल वाढणे गरजेचे: डॉ. राजनीश कामत

गुजरातवर पुन्हा घोंगावतय ‘या’ चक्रीवादळाचं संकट

गुजरात ( वृत्तसंस्था ) गुजरातला पुन्हा एकदा चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. याबाबत भारतीय हवामान शुक्रवारी अधिसूचना दिली असून, त्यानुसार दक्षिण-पूर्व आणि नैऋत्य-पश्चिम अरबी समुद्रावर दाबाचे क्षेत्र विकसित झाले आहे. 21 ऑक्टोबरच्या सकाळपर्यंत त्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे. ते गुजरातच्या किनारपट्टीकडे सरकण्याचीही शक्यता आहे. हवामान खात्याने सविस्तररित्या जारी केलेल्या भारतीय हवामान बुलेटिनमध्ये म्हटले आहे… Continue reading गुजरातवर पुन्हा घोंगावतय ‘या’ चक्रीवादळाचं संकट

‘सुमंगलम’ पंचमहाभूत महोत्सव तयारीला वेग! मुख्यमंत्र्यांनी घेतली आढावा बैठक

अग्नि, जल, वायू, आकाश, पृथ्वी या पाच पंचमहाभूतांच्या रक्षणाचा संदेश देण्यासाठी पंचभौतिक महोत्सवाचे आयोजन कणेरी मठावर करण्यात आले आहे. २० ते २६ फेब्रुवारी दरम्यान हा महोत्सव पार पडणार असून या या महोत्सवाच्या पूर्वतयारीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा बैठक मंत्रालयात पार पडली. मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी ही बैठक पार पडली असून… Continue reading ‘सुमंगलम’ पंचमहाभूत महोत्सव तयारीला वेग! मुख्यमंत्र्यांनी घेतली आढावा बैठक

कोल्हापूरला फुलांचे शहर बनवूया : संजय शिंदे

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरात जी उद्याने आहेत, त्या सर्वांना महापालिका, गार्डन क्लब आणि नागरिकांच्या समन्वयातून विकसित करूया तसेच कोल्हापूरला फुलांचे शहर बनवूया, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी केले. महापालिका व गार्डन क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने महावीर उद्यानामध्ये भव्य पुष्प प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी शहर अभियंता नेत्रदीप… Continue reading कोल्हापूरला फुलांचे शहर बनवूया : संजय शिंदे

कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा अंदाज

मुंबई (वृत्तसंस्था) : येत्या ४८ तासांत कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा अंदाज आहे. बहुतांश भागात ढगाळ हवामानामुळे ऐन हिवाळ्यात उकाडा, इन्फ्लुएन्झाचा धोका वाढला आहे. दरम्यान, महाराष्ट्रात दोन दिवसांपासून थंडी जाणवत असली तरी दुपारी उकाडा होताना दिसत आहे. वातावरणात होणाऱ्या झपाट्याच्या बदलांमुळे जनजीवनावर प्रचंड परिणाम दिसून येत आहे. दरम्यान, बदलत्या हवामानामुळे रबी पीकही धोक्यात आले आहे. बंगालच्या… Continue reading कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा अंदाज

मसाई पठार संरक्षित क्षेत्र घोषित

कोल्हापूर (प्रतिनिधी) : ऐतिहासिक किल्ले पन्हाळागडाजवळील मसाई पठार क्षेत्र ‘संवर्धित राखीव क्षेत्र’ म्हणून वनविभागाने आज जाहीर केले. त्यामुळे मसाई पठार परिसरातील आकर्षक फुलझाडीसह वन्यजीवांचे संरक्षण होण्यास मदत होणार आहे. या सोबत शाहूवाडी तालुक्यातील बेरवाडी व खोतवाडी येथील क्षेत्र याच संवर्धन क्षेत्रात राखीव झाले आहे. तसा आदेश वनविभागाने काढल्यामुळे जिल्ह्यातील संवेदनशील वनक्षेत्र व वनसंपदा अबाधित राहण्यास… Continue reading मसाई पठार संरक्षित क्षेत्र घोषित

error: Content is protected !!