एसटीच्या ताफ्यातून शिवशाहीचा प्रवास संपणार..?

मुंबई (प्रतिनिधी) : लालपरीचा प्रवास म्हणजे सर्वसामान्यांसाठी खूप सोयीचा आहे. एसटी महामंडळाने आपल्या ताफ्यात अनेक बस दाखल केल्या आहेत. यामध्ये शिवशाही, शिवनेरी, एसी बससारख्या अनेक बस खेडोपाड्यात धावत असतात. मात्र, आता एसटी महामंडळाने मोठा निर्णय घेतला आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यातून आता शिवशाहीचा प्रवास संपणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या बसच्या वाढत्या अपघाताच्या… Continue reading एसटीच्या ताफ्यातून शिवशाहीचा प्रवास संपणार..?

वारकऱ्यांसह राहुल गांधीही पंढरीची वारी पायी चालणार..?

मुंबई – आषाढी एकादशीला महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी अक्खा जनसमुदाय येतो, फक्त महाराष्ट्रातूच नव्हे तर संपूर्ण जगभरातून लोक विठ्ठलाच्या दर्शनासाठी येत असतात. पंढरीला जाणारी आषाढी वारीही महाराष्ट्रातील अनेक वर्षांपासून चालत आलेली महत्त्वाची परंपरा राहिली आहे. पंढरीची वारी हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा सोहळा मानला जातो. याच अनुषंगाने एक महत्वाची बातमी समोर आली आहे. काँग्रेस… Continue reading वारकऱ्यांसह राहुल गांधीही पंढरीची वारी पायी चालणार..?

फ्रान्समध्ये सापडली छत्रपती शिवाजी महाराजांची बखर..

मुंबई (प्रतिनिधी) : फ्रान्समध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची बखर सापडली आहे. पुण्यातील संसोधक गुरुप्रसाद कानिटकर आणि मनोज दाणी यांना ही बखर सापडली आहे. ‘नॅशनल लायब्ररी ऑफ फ्रान्स’मध्ये इतिहास संशोधनासाठी लागणारी काही जुनी कागदपत्रे तसेच पुस्तकं चाळत असताना यांनाछत्रपती शिवाजी महाराजांची जुनी अप्रकाशित बखर सापडली आहे. ही बखर मोडी लिपीतील आहे. हस्तलिखित स्वरूपात असलेली ही बखर शके… Continue reading फ्रान्समध्ये सापडली छत्रपती शिवाजी महाराजांची बखर..

पंढरपूर विठ्ठल मंदिरात सापडले तळघर अन् 6 मूर्ती

पंढरपूर: पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिरात एक तळघर आढळून आले. दरम्यान, मंदिरामध्ये जतन संवर्धनाचे काम सुरू असून ते जवळपास पूर्ण होत आले आहे. सध्या फरशी बसविण्याचे काम सुरू आहे. हे काम सुरू असताना एक फरशी तळघरात पडली होती. फरशी पडल्याने हे तळघर दिसून आलं. यावेळी पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांना तत्काळ बोलावण्यात आलं. या अधिकाऱ्यांनी आतमध्ये उतरण्याचा… Continue reading पंढरपूर विठ्ठल मंदिरात सापडले तळघर अन् 6 मूर्ती

वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! विठुरायाचे चरणस्पर्श दर्शन 2 जूनपासून सुरू

पंढरपुर : पंढरपुरच्या विठ्ठल- रुक्मिणी मातेच्या भक्तांसाठी एक महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे. येत्या 2 जूनपासून पंढरपुरच्या विठुरायाचे चरणस्पर्श दर्शन २ जूनपासून सुरू होणार आहे. याबाबतची माहिती विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे प्रमुख गहिनीनाथ औसेकर यांनी दिली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मंदिराच्या गाभाऱ्याचे काम सुरु होते. त्यामुळं विठ्ठलाचे चरणस्पर्श दर्शन बंद होते. आता पुन्हा दर्शन सुरु… Continue reading वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! विठुरायाचे चरणस्पर्श दर्शन 2 जूनपासून सुरू

नवरा-बायकोच भांडण सोडवायला गेला अन् जीव गमावून बसला…

पंढरपूर (प्रतिनिधी) : पंढरपूर तालुक्यातील नारायण चिंचोली येथील परमेश्वर गाडे आणि त्याच्या बायकोचं कडाक्याचे भांडण सुरू झाले होते. त्यामुळे त्यांच्या शेजारी राहात असलेले संतोष चौगुले हे भांडण सोडवायला गेले होते. यावेळी डोक्यावर परिणाम झालेल्या परमेश्वर गाडे याने संतोष चौगुले यांनाच मारायला सुरुवात केली. तसेच हातातील कोयत्यासारख्या धारदार शस्त्राने वार करण्यास सुरुवात केली. यावेळी यांच्या डोक्यावर… Continue reading नवरा-बायकोच भांडण सोडवायला गेला अन् जीव गमावून बसला…

खून केलेल्या आरोपीचा पंढरपूर तालुका पोलिसांनी दोन तासात लावला छडा…

पंढरपूर (प्रतिनिधी) : मौज आंबे चिंचोली येथे दगडाने मारल्याचा राग मनात धरून एका व्यक्तीच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करून खून केल्याची घटना मंगळवारी घडली होती. याचीमाहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांनी तपासचक्रे फिरवून अवघ्या दोन तासात आरोपीला अटक केली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गणपत बबन जाधव (रा. कार्ला, ता. मावळ,… Continue reading खून केलेल्या आरोपीचा पंढरपूर तालुका पोलिसांनी दोन तासात लावला छडा…

आ. समाधान आवताडे यांच्या माध्यमातून १० कोटींचा निधी मंजूर…

पंढरपूर (प्रतिनिधी) : नगरपरिषदांना वैशिष्ट्यपूर्ण विशेष अनुदान योजनेअंतर्गत पंढरपूर व मंगळवेढा येथील नगरपरिषदांच्या विविध विकासकामांसाठी आमदार समाधान आवताडे यांच्या माध्यमातून १० कोटी निधी मंजूर झाला आहे. या निधीमध्ये पंढरपूर नगरपरिषद अंतर्गत विकास कामांसाठी ५ कोटी व मंगळवेढा नगरपरिषद अंतर्गत ५ कोटी निधी मंजूर झाला आहे. या नियोजित निधी मंजुरीसाठी आ. आवताडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,… Continue reading आ. समाधान आवताडे यांच्या माध्यमातून १० कोटींचा निधी मंजूर…

पत्रकारास धक्काबुक्की करणे भोवले; सोलापूर जिल्ह्यातील पहिला गुन्हा दाखल…

बार्शी (प्रतिनिधी) : जबाबदारी पार न पाडण्याबाबत वार्तांकन केल्याचा राग मनात धरून पत्रकारास धमकी देऊन धक्काबुक्की करत वार्तांकनास अडथळा निर्माण केल्याप्रकरणी एकावर पत्रकार संरक्षण कायदयांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. किरण माने, प्रोजेक्ट मॅनेजर, स्वयम शिक्षण प्रयोग (रा. धाराशिव) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. 2017 साली अस्तित्वात आलेल्या पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत दाखल झालेला सोलापूर… Continue reading पत्रकारास धक्काबुक्की करणे भोवले; सोलापूर जिल्ह्यातील पहिला गुन्हा दाखल…

बचत गटांच्या जिल्हास्तरीय मॉलसाठी प्रयत्नशील -पालकमंत्री चंद्रकांत पाटील

सोलापूर ( प्रतिनिधी ) उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत सोलापूरमधील रंगभवन जवळील वोरोनाका प्रशालेमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मिनी सरस व जिल्हास्तरीय रुक्मिणी महोत्सव प्रदर्शन व विक्री केंद्राचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. उमेदच्या माध्यमातून बचत गटातील महिलांना विविध उद्योग व्यवसायाचे प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे नमूद करून त्या बचत गटातील महिलांनी उत्पादित… Continue reading बचत गटांच्या जिल्हास्तरीय मॉलसाठी प्रयत्नशील -पालकमंत्री चंद्रकांत पाटील

error: Content is protected !!