Sharad Pawar यांची राष्ट्रवादी खरचं ‘घरवापसी’ करणार ?

मुंबई ( वृत्तसंस्था ) शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतील गटबाजीबाबत महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग आला आहे. महाराष्ट्रातील काही टीव्ही चॅनेल्सवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आपला गट काँग्रेसमध्ये विलीनी करणार असल्याचा दावा करण्यात आला होता. दरम्यान शरद पवार यांनी आपल्या पक्षाच्या सर्व बड्या नेत्यांची पुण्यात बैठक बोलावली होती, त्यामुळे या बातमीला बळ मिळाले. मात्र यावर शरद… Continue reading Sharad Pawar यांची राष्ट्रवादी खरचं ‘घरवापसी’ करणार ?

Sonia Duhan: जो आपल्या कुटुंबाचा झाला नाही तो देशाचा काय होणार ?

लाईव्ह मराठी प्रतिनिधी ( सुमित तांबेकर ) जो नेता आपल्या कुटुंबाचा झाला नाही तो देशाचा काय होणार ? असा खरमरीत सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सोनिया दुहान यांनी केला आहे. राष्ट्रवादीच्या निकालावरुन आता शरद पवार गट आक्रमक झाला असून, ही लढाई सुरुच राहणार असल्याचं ही त्यांनी म्हटलं आहे. याबाबत बोलताना दुहान यांनी म्हटलं आहे की, देशातील… Continue reading Sonia Duhan: जो आपल्या कुटुंबाचा झाला नाही तो देशाचा काय होणार ?

”लोकसभेच्या पार्श्वभूमीवर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणाला सुरूवात”

पुणे ( प्रतिनिधी ) लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 5 ते 9 फेब्रुवारी दरम्यान भारत निवडणूक आयोगाने अधिकाऱ्यांचे विभागस्तरीय प्रशिक्षण सुरु केले आहे. यामध्ये सध्या पुणे विभागातील सर्व लोकसभा मतदार संघातील सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे विभागस्तरीय प्रशिक्षण सुरु करण्यात आले आहे. याचे उद्घाटन भारत निवडणूक आयोगाचे वरिष्ठ प्रधान सचिव एन.एन. बुटोलिया यांच्या हस्ते करण्यात आले. श्री. बुटोलिया… Continue reading ”लोकसभेच्या पार्श्वभूमीवर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणाला सुरूवात”

उद्धवसेना जनतेच्या न्यायालयात; नार्वेकर अन् शिंदे यांचा थेट व्हिडीओच***

लाईव्ह मराठी ( सुमित तांबेकर ) उद्धव सेनेने आज जनतेचं न्यायालय या आशयाखाली आज एक बैठक घेतली असून, या बैठकीत तत्कालीन शिवसेनेतील पक्षांतर्गत झालेल्या निवडीचे व्हिडीओ सादर केले आहेत, यावेळी पक्षांतर्गत करण्यात आलेल्या नेत्यांची माहिती आणि याबाबतचे निवडणूक आयोगाला सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांच्या प्रती ही सादर करण्यात आल्या आहेत. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना प्रसिद्ध कायदेज्ज्ञ… Continue reading उद्धवसेना जनतेच्या न्यायालयात; नार्वेकर अन् शिंदे यांचा थेट व्हिडीओच***

वसुंधरा राजे होणार एक वर्षासाठी मुख्यमंत्री ? जे.पी. नड्डा यांना फोन करत केली ‘ही’ मागणी

राजस्थान ( वृत्तसंस्था ) राजस्थानच्या दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या भाजप नेत्या वसुंधरा राजे पुन्हा मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत. या शर्यतीत इतर दावेदारांना मागे टाकत वसुंधरा आता 1 वर्षासाठी मुख्यमंत्री होऊ शकतात. प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या बातमीनुसार वसुंधरा राजे यांनी पक्षाध्यक्ष जेपी नड्डा यांना फोन करून एक वर्षासाठी मुख्यमंत्रीपद मागितले आहे. राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांबाबत वसुंधरा राजे यांनी आपल्या दाव्याबाबत… Continue reading वसुंधरा राजे होणार एक वर्षासाठी मुख्यमंत्री ? जे.पी. नड्डा यांना फोन करत केली ‘ही’ मागणी

एका सैनिकाने दिग्गज मंत्र्याला चारली धूळ; 17 हजार मतांनी झाला विजयी

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) सीआरपीएफ देशसेवा करणाऱ्या एका जवानाने दिग्गज नेत्याला धूळ चारल्याची चर्चा आता संपुर्ण छत्तीसगढमध्ये सुरु आहे. सीआरपीएफ मधून राम कुमार टोप्पो यांनी स्वैच्छिक निवृत्ती घेतली. आणि सीतापूर विधानसभा मतदारसंघातून भूपेश बघेल सरकारचे मंत्री यांचा 17 हजारांहून अधिक मतांनी पराभव केला. या वर्षाच्या सुरुवातीला, सीआरपीएफमध्ये सेवा देत असलेल्या टोप्पोला छत्तीसगडमधील जगदलपूर येथे… Continue reading एका सैनिकाने दिग्गज मंत्र्याला चारली धूळ; 17 हजार मतांनी झाला विजयी

धक्कादायक..! बिहारमधील एक तृतीयांश कुटुंबे जगतायेत दारिद्र्यरेषेखाली

पटना ( वृत्तसंस्था ) बिहारमधील एक तृतीयांश कुटुंबे दारिद्र्यरेषेखाली जीवन जगत आहेत. त्यांना महिन्याला 6000 रुपये किंवा त्याहून कमी कमाई होत आहे. मंगळवारी विधानसभेत मांडण्यात आलेल्या जात सर्वेक्षणाच्या सविस्तर अहवालातून ही बाब समोर आली आहे. उच्चवर्णीयांमध्ये खूप गरिबी आहे, पण मागासवर्गीय, दलित आणि आदिवासींची टक्केवारी त्यांच्यापेक्षा जास्त असल्याचेही अहवालात मान्य करण्यात आले आहे. संसदीय कामकाज… Continue reading धक्कादायक..! बिहारमधील एक तृतीयांश कुटुंबे जगतायेत दारिद्र्यरेषेखाली

‘भोगावती’ बिनविरोधसाठी सर्व पक्ष तयार; मात्र जागा वाटपाचा तिढा कायम

राशिवडे ( प्रतिनिधी ) भोगावती सहकारी साखर कारखाना बिनविरोध करण्यासंदर्भात सर्वपक्षीय बैठक झाली. यामध्ये कारखाना वाचवायचा असेल तर निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आम्ही तयार आहोत. असा सूर सर्व पक्षांनी व्यक्त केला. मात्र जागा वाटपाचा तिढा अद्याप कायम असल्याने तो सोडविण्यासाठी नेत्यांचा कस लागणार आहे. भोगावतीची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी ज्येष्ठ सभासद बी. के. डोंगळे यांनी सर्वपक्षीय बैठकीचे… Continue reading ‘भोगावती’ बिनविरोधसाठी सर्व पक्ष तयार; मात्र जागा वाटपाचा तिढा कायम

सांगोल्यात खरेदी-विक्री संघाचे ११ फेब्रुवारी रोजी मतदान

१७ जागेसाठी ५६ अर्ज दाखल  सांगोला/ नाना हालंगडे सांगोला तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाच्या पंचवार्षिक निवडणूकीच्या १७ जागेसाठी दाखल झालेल्या ६० अर्जापैकी ५६ अर्ज वैद्य ठरले तर ४ अर्ज अवैध ( नामंजूर ) झाले आहेत दरम्यान नामंजूर चार अर्जावर येत्या सोमवार १५ जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे. येत्या मंगळवार १६ ते सोमवार ३० जानेवारीपर्यंत अर्ज… Continue reading सांगोल्यात खरेदी-विक्री संघाचे ११ फेब्रुवारी रोजी मतदान

नाशिकमध्ये शुभांगी पाटील यांना ठाकरे गटाचा पाठिंबा

नाशिक (वृत्तसंस्था) : नाशिक पदवीधरच्या जागेसाठी काँग्रेसचे डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी देण्यात आली होती; पण डॉ. सुधीर तांबे यांनी ऐनवेळी माघार घेत काँग्रेसला धक्का दिला. त्या ठिकाणी त्यांचे चिंरजीव सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी केली. आपण काँग्रेसमध्येच असून, सर्व पक्षांना पाठिंबा मागणार असल्याचे सत्यजित तांबे यांनी जाहीर केले. आता काँग्रेसने सत्यजित तांबेंना पाठिंबा देण्यास… Continue reading नाशिकमध्ये शुभांगी पाटील यांना ठाकरे गटाचा पाठिंबा

error: Content is protected !!