शेतीच्या वादातून सख्ख्या भावाच्या कुटुंबीयांनी वृद्धाला जीवंत जाळलं

नाशिक : नाशिक मध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. शेतजमीनिच्या वादातून एका शेतकऱ्याला जीवंत जाळण्यात आलं आहे. या घटनेत वृद्ध शेतकरी ९५ टक्के भाजला असून त्यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. कचेश्वर नागरे (वय ८०) असं मृत शेतकऱ्याचं नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात जमिनीच्या मालकीवरुन सख्ख्या भावाच्या कुटुंबीयांनीच वृद्धाला… Continue reading शेतीच्या वादातून सख्ख्या भावाच्या कुटुंबीयांनी वृद्धाला जीवंत जाळलं

पदवीधर, शिक्षक वर्गाला ‘या’ बाजारात ओढू नका : खा.संजय राऊत

नाशिक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिकला येऊन गेले. ते कशासाठी येतात हे सर्वांनाच माहिती आहे. शेअर बाजाराप्रमाणे शिक्षकांना भाव लावला जात आहे.  शिक्षकांना विकत घेऊ नका, परंपरा मोडू नका. जळगावला पैसे वाटप झाल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी व्हिडीओद्वारे केला. लोकसभा निवडणुकीत हेलिकॉप्टरमधून 20 कोटी उतरवले हे सगळ्यांनी पाहिले. पदवीधर, शिक्षक वर्गाला या बाजारात ओढू नका,अशी टीका… Continue reading पदवीधर, शिक्षक वर्गाला ‘या’ बाजारात ओढू नका : खा.संजय राऊत

फक्त 500 रुपयांसाठी मित्राने केला मित्राचा निर्घृण खून

नाशिक : नाशिकमधून महत्वाची बातमी समोर आली आहे.. मैत्रीला काळिमा फासणारी घटना नाशिकमधील भारत नगर भागात घडली आहे. फक्त 500 रुपयांसाठी मित्रानेच मित्राचा धारधार शस्त्राने निर्घृण खून केला आहे.. मोबाईल देण्यघेण्या वरून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेबाबत मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयीत आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. मिळालेल्या… Continue reading फक्त 500 रुपयांसाठी मित्राने केला मित्राचा निर्घृण खून

आव्हाडांना विरोधासाठी विरोध नको, तर मनुस्मृतीला विरोध… ; भुजबळांचे दरेकरांना उत्तर

नाशिक : शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महाड येथील चवदार तळ्याच्या परिसरात मनुस्मृतीचे दहन केले. यावेळी आव्हाड यांच्याकडून अनावधानाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडण्यात आला. यावरून राज्याचे वातावरण चांगलेच तापले आहे. आव्हाडांच्या या कृतीचा महायुतीकडून जोरदार निषेध करण्यात येत आहे. पण अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी आव्हाडांची पाठराखण केली… Continue reading आव्हाडांना विरोधासाठी विरोध नको, तर मनुस्मृतीला विरोध… ; भुजबळांचे दरेकरांना उत्तर

आचारसंहिता उल्लंघनप्रकरणी ‘या’ उमेदवारावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता

नाशिक : लोकसभा निवडणुकीत उमेदवारांकडून लोकांचे लक्ष वेधण्यासाठी विविध गोष्टी केल्या जातात. ईव्हीएम मशीनला हार घातल्याप्रकरणी नाशिक लोकसभा मतदारसंघातील एका अपक्ष उमेदवारावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मतदानानंतर ईव्हीएमला हार घातल्याप्रकरणी अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराजांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. हा गुन्हा आचारसंहिता उल्लंघनप्रकरणी दाखल होण्याची शक्यता आहे. शांतीगिरी महाराजांनी मतदान केल्यानंतर एटीव्हीएम… Continue reading आचारसंहिता उल्लंघनप्रकरणी ‘या’ उमेदवारावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता

सध्या ‘त्यांची’ बुद्धी भ्रष्ट झाली आहे : चंद्रशेखर बावनकुळे

नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षात चांगलीच जुंपली असल्याचं दिसून येतंय. एकमेकांवर टीका करण्याची संधी प्रतिस्पर्ध्यांकडून सोडली जात नाही. उद्धव ठाकरेंना अनेक आजार झाले असून, ते चिडलेले आणि घाबरलेले आहेत. सध्या त्यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे, अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री… Continue reading सध्या ‘त्यांची’ बुद्धी भ्रष्ट झाली आहे : चंद्रशेखर बावनकुळे

नाशिकमध्ये आज नितीन गडकरी ,आदित्य ठाकरेंची तोफ धडाडणार

नाशिक : लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यापासून राजकीय पक्षांच्या बड्या नेत्यांनी पक्षाच्या उमेदवारांसाठी प्रचार सभांचा धडाका लावला आहे. लोकसभा निवडणुकीचा प्रचार ऐन रंगात आला असून महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची तर महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांची आज… Continue reading नाशिकमध्ये आज नितीन गडकरी ,आदित्य ठाकरेंची तोफ धडाडणार

शरद पवारांचं भाषण सुरू अन् व्यासपीठावर बॅनर कोसळला  

नाशिक : मुंबईतील बॅनर कोसळल्याची घटना ताजी असतानाच आता राजकीय प्रचार सभेदरम्यानही डिजिटल बॅनर कोसळल्याची घटना घडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पावर यांच्या प्रमुख उपस्थितीत आज नाशिक लोकसभा मतदारसंघातील सटाणा येथे जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. राज्यात गेल्या काही दिवसांपासून वादळी वाऱ्यासह मुसळधार व अवकाळी पाऊस पडत आहे. आजही वादळी वाऱ्याने शर पवारांची सभा सुरू असताना पाठीमागील… Continue reading शरद पवारांचं भाषण सुरू अन् व्यासपीठावर बॅनर कोसळला  

संजय राऊतांचा मुख्यमंत्री शिंदेंवर गंभीर आरोप ; थेट पंतप्रधानांना पत्र..!

मुंबई – सध्या देशात लोकसभा रणांगण सुरु आहे. देशातील चार टप्प्यातील मतदान पार पडले असून, पाचव्या टप्प्यातील मतदानाचे प्रचार सुरु आहे. या प्रचारादरम्यांन विरोधी पक्ष नेते एकमेकांवर आक्रमक भूमिका मांडत आहेत. ठाकरे आणि शिंदे गटातील धुसमुस पाहायला मिळत असते. दोन्ही नेते एकमेकांवर निशाणा साधण्याची संधी सोडत नाहीत. अशातच आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी मुख्यमंत्री… Continue reading संजय राऊतांचा मुख्यमंत्री शिंदेंवर गंभीर आरोप ; थेट पंतप्रधानांना पत्र..!

हिंदू-मुस्लिम वाद लावून समाजा समाजात तेढ निर्माण करण्याचा मोदींचा प्रयत्न : संजय राऊत

नाशिक : देश संकटात आहे संविधान संकटात आहे त्यामुळे सर्वांनी ही तानाशाही संपवण्यासाठी पुढाकार घेऊन लढायला पाहिजे.हिंदू-मुस्लिम वाद लावून समाजा समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न मोदींकडून सुरू असल्याची टीका उबाठा पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारार्थ ठाकरे सेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी नाशिकमधील चौक मंडई… Continue reading हिंदू-मुस्लिम वाद लावून समाजा समाजात तेढ निर्माण करण्याचा मोदींचा प्रयत्न : संजय राऊत

error: Content is protected !!