एनडी स्टुडिओ आता गोरेगाव फिल्मसिटीच्या ताब्यात..

मुंबई (प्रतिनिधी) : दिवंगत प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांचा एनडी स्टुडिओचा ताबा गोरेगाव फिल्मसिटीने घेतला आहे. राज्य सरकारचे सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगेंनी एनडी स्टुडिओची पाहणी केली. त्यामुळे हा स्टुडिओ आता राज्य सरकारच्या ताब्यात आला आहे. तर 2 ऑगस्ट 2023 मध्ये या स्टुडिओतच नितीन देसाई यांनी आत्महत्या केली होती. त्यांच्या आत्महत्येमुळे… Continue reading एनडी स्टुडिओ आता गोरेगाव फिल्मसिटीच्या ताब्यात..

एसटीच्या ताफ्यातून शिवशाहीचा प्रवास संपणार..?

मुंबई (प्रतिनिधी) : लालपरीचा प्रवास म्हणजे सर्वसामान्यांसाठी खूप सोयीचा आहे. एसटी महामंडळाने आपल्या ताफ्यात अनेक बस दाखल केल्या आहेत. यामध्ये शिवशाही, शिवनेरी, एसी बससारख्या अनेक बस खेडोपाड्यात धावत असतात. मात्र, आता एसटी महामंडळाने मोठा निर्णय घेतला आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यातून आता शिवशाहीचा प्रवास संपणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या बसच्या वाढत्या अपघाताच्या… Continue reading एसटीच्या ताफ्यातून शिवशाहीचा प्रवास संपणार..?

लाईव्ह मराठी – प्रूडंट मिडियाचे नामवंत उद्योजकांकडून कौतुक

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरातील अग्रगण्य मीडिया समूह लाईव्ह मराठी आणि गोव्यातील प्रसिद्ध प्रूडंट नेटवर्क यांच्या संयुक्त विद्यमाने सयाजी हॉटेल येथे कोल्हापुरातील नामवंत उद्योगपतींची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी उद्योजकांकडून प्रूडंट मिडिया आणि लाईव्ह मराठीचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाची सुरुवात केशव तळवडेकर यांनी कोल्हापूरचा नेमबाज ऑलिंपिकवीर स्वप्निल कुसाळे याचे अभिनंदन करून आणि… Continue reading लाईव्ह मराठी – प्रूडंट मिडियाचे नामवंत उद्योजकांकडून कौतुक

प्रुडंट मीडिया नेटवर्कच्या प्रतिनिधींनी घेतली आयुक्त के. मंजूलक्ष्मी यांची भेट

कोल्हापूर : गोव्यातील नंबर एकच नेटवर्क असलेल्या प्रुडंट मीडिया नेटवर्क गोवा आणि कोल्हापुरातील नंबर 1 चे डिजिटल नेटवर्क असणाऱ्या लाईव्ह मराठी यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी कोल्हापुरातील आघाडीच्या उद्योजकांची एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकी आधी प्रुडंट मीडिया नेटवर्क आणि लाईव्ह मराठीच्या प्रतिनिधींनी कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रशासक आणि आयुक्त के. मंजूलक्ष्मी यांची भेट घेऊन शहरातील… Continue reading प्रुडंट मीडिया नेटवर्कच्या प्रतिनिधींनी घेतली आयुक्त के. मंजूलक्ष्मी यांची भेट

राज्यात पावसाचा जोर कायम : रत्नागिरीसह चंद्रपूरला रेड अलर्ट

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात गेल्या आठवड्याभरापासून सुरू असणाऱ्या पावसाने अद्यापही उसंत दिली नाही. तर बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळं या आठवडाभरात पावसाचा जोर वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. याचा परिणाम कोकणासह मुंबईचे किनारा क्षेत्र, उपनगरीय भाग आणि कोकणातील संपूर्ण किनारपट्टी भागामध्ये वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, रत्नागिरी,… Continue reading राज्यात पावसाचा जोर कायम : रत्नागिरीसह चंद्रपूरला रेड अलर्ट

लोकराजा छत्रपती शाहू महाराजांची जयंती साजरी होणार गोव्यात..! 

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांची 150 वी जयंती गोवा राज्य सरकारसह लाईव्ह मराठी आणि प्रुडेंट मीडिया यांच्या माध्यमातून गोव्यात साजरी होत आहे. हा सोहळा रवींद्र भवन सांखळी येथे पार पडणार आहे. यात गोवा राज्य सरकार सहभागी होत असल्याने या जयंती सोहळ्याकडे पश्चिम महाराष्ट्रासह कोकणातील असंख्य शाहू प्रेमींच लक्ष लागलं आहे. या… Continue reading लोकराजा छत्रपती शाहू महाराजांची जयंती साजरी होणार गोव्यात..! 

दिल्ली उत्पादन शुल्क धोरण प्रकरणः अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळणार ?

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) अबकारी धोरण घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणातील आरोपी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नियमित जामीन अर्जावर आणि वैद्यकीय तपासणीदरम्यान पत्नीच्या हजेरीबाबत दाखल केलेल्या अर्जावर राऊस एव्हेन्यू कोर्टात सुनावणी झाली. या याचिकेवरील सविस्तर सुनावणीनंतर न्यायालयाने गुरुवारी निर्णय राखून ठेवला. आज झालेल्या सुनावणीदरम्यान ईडीने केजरीवाल यांच्या जामीन अर्जाला विरोध केला. एएसजी राजू… Continue reading दिल्ली उत्पादन शुल्क धोरण प्रकरणः अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळणार ?

‘बिग बॉस’मधून सलमान खानची एक्झिट : अनिल कपूरची एन्ट्री

मुंबई (प्रतिनिधी) : ‘बिग बॉस ओटीटी’चा तिसरा सीझन लवकरच सुरु होणार आहे. यात मोठा ट्विस्ट आला असून ‘बिग बॉस’चा होस्ट सलमान खान यातून बाहेर पडला आहे. त्याच्या ऐवजी बॉलिवूडचे लोकप्रिय अभिनेते अनिल कपूर हे ‘बिग बॉस ओटीटी ३’ च्या सूत्रसंचालनाची जबाबदारी सांभाळणार आहेत. यावेळी अनिल कपूर यांनी, जेव्हा मला बिग बॉसची ऑफर मिळाली तेव्हा मलाही… Continue reading ‘बिग बॉस’मधून सलमान खानची एक्झिट : अनिल कपूरची एन्ट्री

फ्रान्समध्ये सापडली छत्रपती शिवाजी महाराजांची बखर..

मुंबई (प्रतिनिधी) : फ्रान्समध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची बखर सापडली आहे. पुण्यातील संसोधक गुरुप्रसाद कानिटकर आणि मनोज दाणी यांना ही बखर सापडली आहे. ‘नॅशनल लायब्ररी ऑफ फ्रान्स’मध्ये इतिहास संशोधनासाठी लागणारी काही जुनी कागदपत्रे तसेच पुस्तकं चाळत असताना यांनाछत्रपती शिवाजी महाराजांची जुनी अप्रकाशित बखर सापडली आहे. ही बखर मोडी लिपीतील आहे. हस्तलिखित स्वरूपात असलेली ही बखर शके… Continue reading फ्रान्समध्ये सापडली छत्रपती शिवाजी महाराजांची बखर..

आज रंगणार कुवेत विरुद्ध भारत फुटबॉल सामना : सुनिल छेत्रीचा अंतिम सामना

मुंबई (प्रतिनिधी) : भारताचा सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटूंपैकी एक फुटबॉलपटू म्हणजे सुनील छेत्री. आज 6 जूनरोजी आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील छेत्री हा अखेरचा सामना खेळण्यासाठी मैदानावर उतरणार आहे, फिफा वर्ल्डकप पात्रता फेरीत कुवेतविरुद्ध भारताचा सामना होणार आहे. तर सुनीलला विजयी निरोप देण्याचा भारतीय संघाचा निर्धार केला आहे. सुनीलने आपल्या १९ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत भारतासाठी अनेक विक्रम प्रस्थापित केले. भारताकडून… Continue reading आज रंगणार कुवेत विरुद्ध भारत फुटबॉल सामना : सुनिल छेत्रीचा अंतिम सामना

error: Content is protected !!