कोल्हापूरात अकराशे महिलांचे कुंकुमार्चन : कर्नाटकातील महिलांचा सहभाग

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूरातील विश्व हिंदू परिषद आणि कर्नाटकातील दास साहित्य परिषदेतर्फे आज श्री अंबाबाईच्या चरणी कुंकुमार्चन पार पडले. यामध्ये बेळगाव, निपाणी, कोल्हापूर परिसरातून आलेल्या अकराशे महिलांनी  सहस्त्र नामावलीसह कुंकुमार्चन केले. हा सोहळा पेटाळा मैदानावर घेण्यात आला. या सोहळयाचा प्रांरभ  सकाळी अंबाबाई मंदीरातून ११०० पिवळया साडया परिधान केलेल्या महिलांच्या शोभायात्राने झाला. ही शोभायात्रा अंबाबाई मंदीरातून… Continue reading कोल्हापूरात अकराशे महिलांचे कुंकुमार्चन : कर्नाटकातील महिलांचा सहभाग

नागनूर येथे सरकारी प्रायमरी मराठी स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न…

निपाणी (प्रतिनिधी) : निपाणी तालुक्यातील नांगणूर येथील सरकारी प्रायमरी मराठी स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठया दिमाखात साजरे झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यमग्रणीचे ग्रामपंचायत अध्यक्ष नासिरखान इनामदार होते. तर प्रमुख अतिथी अरुण बने होते. यावेळी रणजित पोवार, मारुती कांबळे आणि मान्यवरांच्या हस्ते नारळ फोडून आणि फित कापून उद्घाटन करण्यात आले. यावेळी शाळेला देणगी देणाऱ्यांचे सत्कार करण्यात आले.… Continue reading नागनूर येथे सरकारी प्रायमरी मराठी स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न…

पुष्पा 2 नंतर अल्लू अर्जुन झळकणार ‘या’ चित्रपटामध्ये..!

हैद्राबाद : सरत्या वर्षात साऊथचा अभिनेता अल्लू अर्जुन बॉक्स ऑफिसचा बादशहा बनला आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. त्याच्या पुष्पा 2 या चित्रपटानं रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे आणि अजूनही त्याची कमाई थांबण्याची चिन्ह दिसत नाहीत. या चित्रपटानं सर्व भाषांमध्ये 1000 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटांचाही पुष्पा 2 वर काहीही परिणाम झालेला… Continue reading पुष्पा 2 नंतर अल्लू अर्जुन झळकणार ‘या’ चित्रपटामध्ये..!

मोठी बातमी : अभिनेता अल्लू अर्जुनला अटक

हैद्राबाद : दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेता अल्लू अर्जुनला हैदराबादच्या संध्या थिएटर प्रकरणात अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. 4 डिसेंबर रोजी चित्रपटाच्या स्क्रीनिंग दरम्यान, थिएटरमध्ये झालेल्या गोंधळात एका 35 वर्षाच्या महिलेचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या घरी जाऊन अटक करण्यात आली आहे. 4 डिसेंबर रोजी संध्या थिएटरमध्ये ‘पुष्पा 2’ या चित्रपटाचा प्रीमिअर… Continue reading मोठी बातमी : अभिनेता अल्लू अर्जुनला अटक

अक्षय शिंदेच्या मृत्यूप्रकरणी न्यायालयाचे ‘CID’ वर ताशेरे…

मुंबई (प्रतिनिधी) : बदलापूर शाळेतील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेंच्या पोलिस कोठडी मृत्यूप्रकरणाचा तपास गांभीर्याने न केल्याबद्दल न्यायालायाने CID वर ताशेरे ओढले आहेत. सीआयडीचे वर्तन संशयास्पद असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. न्यायालयाच्या या निरीक्षणानंतर पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात झाली आहे. न्या. रेवती मोहिते-डेरे आणि न्या. पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पाडली. तेव्हा… Continue reading अक्षय शिंदेच्या मृत्यूप्रकरणी न्यायालयाचे ‘CID’ वर ताशेरे…

‘या’ प्रसिद्ध कन्नड अभिनेत्रीचा संशयास्पद मृत्यू…

मुंबई (प्रतिनिधी) : दाक्षिणात्य सिनेविश्वातून हादरवून टाकणारी बातमी समोर आली आहे. कन्नड टीव्ही अभिनेत्री शोभिता शिवन्ना (वय 30) हिचा काल (रविवार) धक्कादायक मृत्यू झाला आहे. तिचा हैदराबादमध्ये संशयास्पद अवस्थेत तिचा मृतदेह आढळून आला. ही घटना कोंडापूर याठिकाणी असणाऱ्या श्रीरामनगर कॉलनीत घडली. शोभिताचा मृतदेह तिच्या अपार्टमेंटच्या छताला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस घटनास्थळी… Continue reading ‘या’ प्रसिद्ध कन्नड अभिनेत्रीचा संशयास्पद मृत्यू…

नागा चैतन्याचा हळदी सोहळा मोठ्या थाटामाटात पार

हैदराबाद : नागा चैतन्य हा दाक्षिणात्य सुपरस्टार आहेत. नागा चैतन्य आणि शोभिता धुलीपालाचा हळदी सोहळा पार पडला आहे. नागा चैतन्य आणि शोभिता धुलीपालाच्या हळदीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केलेले आहेत. या पारंपरिक हळदी समारंभावर चाहते प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहेत. नागा चैतन्य आणि शोभिता धुलीपाला हे दोघेही एकत्र खूप सुंदर दिसत आहेत. नागा चैतन्य आणि… Continue reading नागा चैतन्याचा हळदी सोहळा मोठ्या थाटामाटात पार

वादानंतर समोरासमोर आले धनुष आणि नयनतारा, नंतर काय घडलं..?

मुंबई : दाक्षिणात्य सिनेसृष्टीत ‘लेडी सुपरस्टार’ म्हणून ओळख असणाऱ्या अभिनेत्री नयनतारा हिनं अभिनेता धनुषवर गंभीर आरोप केले होते. तिनं जाहीरपणे भलीमोठी पोस्ट लिहित त्याच्यावर टीका केली होती. दोघांचा हा वाद चांगलाच चर्चेत आला होता.या वादानंतर पहिल्यांदाच दोघे एकमेकांसमोर आल्याचं समोर आलं. नुकतंच चित्रपट निर्माता आकाश भास्करनचं लग्न झालं. त्याच्या लग्नात अनेक लोकप्रिय कलाकारांनी हजेरी लावली… Continue reading वादानंतर समोरासमोर आले धनुष आणि नयनतारा, नंतर काय घडलं..?

निपाणी नगरपालिकेसमोर सफाई कामगारांची निदर्शने

निपाणी (प्रतिनिधी ) – निपाणीतील सफाई कर्मचारी काम करत असताना पर्यावरण अभियंता चंद्रकांत गुड्डन्नावर आणि आरोग्य विभाग अधिकारी विनायक जाधव यांनी सफाई कर्मचाऱ्यांना जातिवाचक अक्षपार्य शब्द बोलल्याने संतप्त कामगारांनी काम बंद करून नगरपालिकेसमोर ठिय्या आंदोलन केले. यावेळी कामगारांकडून पालिका अभियंता गुड्डन्नावर आणि आरोग्य विभाग अधिकारी विनायक जाधव यांचा धिक्कार करत त्यांच्या बदलीची मागणी करण्यात आली.… Continue reading निपाणी नगरपालिकेसमोर सफाई कामगारांची निदर्शने

दिव्यांग मुलांसाठी अनमोल भेट देऊन समाज भान जपले : नामदेव चौगुले

निपाणी ( प्रतिनिधी ) – नितिनकुमार कदम मूकबधिर निवासी विद्यालय निपाणी येथील दिव्यां मुलांसाठी आर्केडिया गणेशोत्सव मंडळ यांच्यावतीने साउंड सिस्टिम भेट कार्यक्रमात पर्यावरणप्रेमी,तंत्रस्नेही शिक्षक नामदेव चौगुले बोलत होते. जहाजावर जीवन जगणारे लोक आणि त्यांनी दिव्यांग मुलांप्रती असणारा प्रेम जिव्हाळा या भेट वस्तुतून दिसून आला असून, आपण सर्व सांस्कृतिक मंडळांसाठी एक नव आदर्श घालून दिला आहे.प्रत्येक… Continue reading दिव्यांग मुलांसाठी अनमोल भेट देऊन समाज भान जपले : नामदेव चौगुले

error: Content is protected !!