कापशी ( प्रतिनिधी ) : सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याने एक जानेवारी ते १५ जानेवारी २०२५ अखेरची ऊसबिले शेतकऱ्यांच्या खात्यांवर अदा केली असल्याची माहिती, गोकुळ दूध संघाचे संचालक आणि कारखान्याचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी दिली.

सोमवार दि. 3 रोजी ही ऊसबिले बँकेमध्ये वर्ग केलेली आहेत. तसेच; तोडणी -वाहतूकदारांची बिलेही संबंधितांच्या बँक खात्यांवर वर्ग केलेली आहेत. मंगळवारपासून दि. ४ संबंधितांनी आपापल्या बँकांशी संपर्क साधून बिलाची उचल करावी, असेही त्यांनी पत्रकात म्हंटले आहे.

निवेदनात अध्यक्ष मुश्रीफ यांनी पुढे म्हटले आहे की, एक फेब्रुवारीपासून कारखान्याकडे गाळपासाठी येणाऱ्या उसाला प्रतिटनाला ३,२०० रू इतका ऊसदर जाहीर केलेला आहे. शेतक-यांनी पिकवलेला सर्वच्या सर्व गाळपासाठी सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याकडे पाठवावा, असे आवाहनही मुश्रीफ यांनी केले आहे.