कोल्हापूर (प्रतिनिधी) : अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथे येत्या 24 आणि 25 डिसेंबर रोजी होणाऱ्या महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद संपन्न होत आहे. या परिषदेसाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हा, गावपातळीवरील वट मंदिराचे प्रतिनिधी, विश्वस्त, पुजारी संचालक कार्यकर्ते यांनी गुगल फॉर्म अथवा स्कॅन कोडद्वारे नाव नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

महाराष्ट्र मंदिर महासंघासह श्री जिवदानी देवी संस्थान,मुंबई, श्री ज्योतिर्लिंग भीमाशंकर देवस्थान, श्री साई पालखी निवारा, शिर्डी, हिंदू जनजागृति समिती या संस्था आयोजक आहेत. या दोन दिवसीय परिषदेमध्ये विविध चर्चासत्रांमध्ये अध्यात्मिक गुरू, मंदिर व्यवस्थापन तज्ञ निवृत्त प्रशासकीय अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. तसेच, विविध ठराव संमत करून त्याचा केंद्र आणि राज्यशासनाकडे पाठपुरावा केला जाणार आहे.