कागल – सध्या सर्वत्र विधानसभेचं रणांगण सुरु आहे. राजकीय नेत्यांचे प्रचार मेळावे सत्र सुरु झालेय. अशातच आता कागल मतदार संघ केंद्र बिंदू बनला आहे. कागलमधील दोन बड्या नेत्यांचा कोल्डवॉर पाहायला मिळत आहे. हे दोन बडे नेते दुसरे तिसरे कुणीही नसून शरदचंद्र पवार गटाचे नेते समरजितसिंह घाटगे आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ आहे. हे दोन बडे नेते एकमेकांवर टीकास्त्र सोडण्याची एक ही संधी सोडत नाहीत. या दोन बड्या नेत्यांचा विधानसभेला लढत होणार आहे. यापूर्वीच सध्या कागलमधील राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. अशातच पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी राजे समरजितसिंह घाटगेंवर निशाणा साधला आहे. मात्र गुरुदक्षिणा द्यायच्या वेळी पाठीत खंजीर खुपसून गेले. समरजितसिंह घाटगे यांनी दोनदा खंजीर खुपसलं अशा तिखट शब्दात घणाघाती हल्ला केला आहे .

काय म्हणाले हसन मुश्रीफ..?

हसन मुश्रीफ म्हणाले, मी 35 वर्ष शरद पवार यांच्या सोबत राहिलो. या काळात काही ना काही फुल ना फुलाची पाकळी म्हणून गुरुदक्षिणा दिली. मात्र समरजीत घाटगे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर सहा महिन्यांनी भाजपमध्ये गेले. त्यांच्याकडून सगळी कामे करून घेतली. फडणवीस यांनी मला सांगितलं की समरजीत घाटगे हे आठवड्याला 25 ते 30 पत्र बदल्या. निधीची आणत होते. मात्र मला नंतर कळालं की यात किती घोळ झालेला आहे. हे ऐकून मला धक्का बसला अस फडणवीस मला म्हणाले होते. आजपर्यंत त्यांनी इतका फायदा भाजपचा देवेंद्र फडणवीस यांचा घेतला. मात्र गुरुदक्षिणा द्यायच्या वेळी पाठीत खंजीर खुपसून गेले. समरजित घाटगे यांनी दोनदा खंजीर खुपसलं, असं हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे.

पुढे मुश्रीफ म्हणाले, परमेश्वराच्या कृपेने 25 वर्ष मला मंत्रिमंडळात देखील काम करण्याची संधी मिळाली. मूलभूत सोयी सुविधायक हा मतदारसंघ मी फार पुढे नेला आहे. कारच्या सगळ्या योजना मी झोपडी पर्यंत आणि चुलीपर्यंत नेण्याचा प्रयत्न केला आहे. अनेक योजना मधील त्रुटी दूर करू शकलो आहे. तालुक्यातील गटातटाचे राजकारण मी संपवलं आहे. 1978 पासून शरद पवार यांचं काम करत आहे. इतक्या वर्षात शरद पवारांच्या आयुष्यात अनेक स्थित्यंतर आली. या काळात सुख दुःखामध्ये छोटा कार्यकर्ता म्हणून मी साहेबांसोबत राहिलो आहे, असंही मुश्रीफांनी म्हटलं आहे. आता यावर . समरजितसिंह घाटगे काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे