मुंबई – कानपूरमध्ये पार पडलेल्या भारत- बांगलादेशविरुध्दच्या कसोटी सामन्यात जुने रेकॉर्ड मोडले जाऊन अनेक नवे रेकॉर्ड बनले. या कसोटी मालिकेनंतर आयसीसीने कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. यामध्ये जसप्रीत बुमराह हा पुन्हा एकदा नंबर वन कसोटी गोलंदाज बनला आहे. अश्विनला मागे टाकतं त्याचे रेटिंग 870 झाले आहे. तर अश्विन आता 869 रेटिंगसह दुसऱ्या स्थावर आहे. कानपूर कसोटीत बुमराहने 6 आणि अश्विनने 5 बळी घेतले आहे.
जैस्वाल तिसर्या स्थानी
फलंदाज यशस्वी जैस्वाल याने शानदार फलंदाजी करत कानपूर सामन्यात शानदार अर्धशतके झळकावली आहेत. या सामन्यात तो पाचव्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर पोहचला आहे. त्याची रेटिंग 792 झाली आहे.
विराट कोहलीची टॉप – 10 मध्ये वापसी
स्टार फलंदाज विराट कोहली चेन्नई कसोटीतील खराब कामगिरीमुळे टॉप – 10 च्या यादीमधून बाहेर पडला होता. पण त्याने आता 724 रेटिंगसह सहाव्या स्थावर झेप घेतली आहे.