कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : उद्योगा संबंधित कोणतीही समस्या उद्भवल्यास ‘सीआयआय’ कडे आपल्या समस्या मांडा व सोडवून घ्या. पोर्टलचा देखील उपयोग करून घ्या, असे आवाहन कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीजचे (सीआयआय) पश्चिम विभागाचे उपाध्यक्ष ऋषिकुमार बागला यांनी केले. हॉटेल पॅव्हेलियनमध्ये ‘सीआयआय’तर्फे आयोजित सदस्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.
ऋषीकुमार बागला यावेळी म्हणाले की, कृषी, पर्यावरणपूरक व्यवसाय, नेतृत्व, लॉजिस्टिक, आदी स्वरूपातील 12 सेंटर ऑफ एक्सलन्स ‘सीआयआय’ कडे आहेत. त्यामुळे उद्योगांशी संबंधित समस्या या प्लॅटफॉर्मवर उद्योजकांनी मांडाव्यात, असे बागला म्हणाले.
‘सीआयआय’च्या पश्चिम विभागाचे संचालक राजेश कपूर, दक्षिण महाराष्ट्र विभागाचे उपाध्यक्ष सारंग जाधव, ज्येष्ठ उद्योजक मोहन घाटगे, ‘स्मॅक’चे अध्यक्ष सुरेंद्र जैन, ‘मॅक’चे अध्यक्ष हरिश्चंद्र धोत्रे, कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष बाबासो कोंडेकर, उद्योजक योगेश कुलकर्णी, सचिन शिरगांवकर, मंगेश पाटील, नितीन वाडीकर, मल्हार भांदुर्गे, वीरेन जाधव, आदित्य पाटील आदी उपस्थित होते.