मुंबई – बॉबी देओलने अॅनिमल चित्रपटात साकारलेल्या नकारानत्मक भूमिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली. अनेक दिवसांपासून तो एका मोठ्या प्रोजेक्टमध्ये दिसणार असल्याची चर्चा होतो. आता यावर शिक्कामोर्तब झाले आहे. बॉबी देओल साऊथ सुपरस्टार थलपथी विजयसोबत मोठा धमाका करणार आहे. त्यांने सोशल मीडियावरून ही माहिती आपल्या चाहत्यांना दिली आहे.
या चित्रपटात येणार एकत्र…
बॉबी देओल आणि थलपथी विजय हे ‘थलपथी 69’ या चित्रपटात पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटात बॉबी नकारात्मक भूमिकेत दिसणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. तसेच या चित्रपटात बॉबी देओल आणि थलपथी विजय सोबत पूजा हेगडे ही मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
‘थलपथी 69’ हा चित्रपट ऑक्टोबर 2025 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे. हा चित्रपट थलपथी विजयचा शेवटचा चित्रपट असू शकतो. तो राजकारणात आल्यानंतर चित्रपटातून पूर्णपणे निवृत्त होऊ शकतो.
बॉबी आणखी एका साऊथ चित्रपट ‘कांगुवा’मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात बॉबी ग्रे सावलीच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट 14 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.