सिंधुदुर्ग : राज्यात गेल्या तीन-चार दिवसांत वेगवेगळ्या घटनांमध्ये पाण्यात बुडून 20 जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. दरम्यान काल अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथे प्रवरा नदीत एसडीआरएफची बोट उलटण्याची दुर्घटना ताजी असताना आज सिंधुदुर्गातील वेंगुर्ले बंदरात बर्फ घेऊन जाणरी एक बोट पलटल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण बेपत्ता आहेत.

आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार , वेंगुर्ले बंदरात रात्री मच्छिमार बोटींना लागणार बर्फ घेऊन बोट घऊन जात असताना बोट उलटली. या बोटीमध्ये एकूण सात खलाशी होते. बोट पलटी झाल्यानंतर तीन जणांनी पोहून किनारा गाठला. तर चार जण बेपत्ता होते, त्यातील दोघांचे मृतदेह सापडले असून दोघे जण अद्याप बेपत्ता आहेत, शोध मोहीम सुरु आहे.

बोट भरकटल्याने घडला हा प्रकार
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला बंदरातून रात्री मच्छिमारांना लागणारा बर्फाची वाहतूक सुरू असताना ही दुर्घटना घडला. रात्री ढगांचा गडगडाट जोरदार वादळी वारे अशी परिस्थिती असल्यामुळे ही बोट भरकटल्याने हा प्रकार घडला असावा असा प्राथमिक अंदाज आहे. बेपत्ता असलेल्या खलाशांपैकी एक खलाशी रत्नागिरीतील तर तीन खलाशी मध्यप्रदेशातील असल्याचे समजते. अन्य होड्यांमधून त्या खलाशांना वाचविण्यासाठी शोध कार्य सुरू झाले.