टोप (प्रतिनिधी) : टोप येथे व्ही मेंबर्स ग्रुपच्या सहाव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून आज हनुमान मंदिर, टोप येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. जीवनधारा ब्लड बँक आणि व्ही मेम्बर्स ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर घेण्यात आलेल्या या रक्तदान शिबिरात एकूण 144 रक्तदात्यानी रक्तदान केले आणि या सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या उपक्रमात आपला सहभाग नोंदविला. या शिबीराचे यशस्वीतेसाठी व्ही मेंबर्स ग्रुपचे कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले शिबीरात टोप मधील युवक , गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.